Sindhudurg News : देवगडमध्ये 'त्या' घराजवळ सुरु होता हादरंवून टाकणारा प्रकार, 5 फूट उंचीची 23 झाडे केली जप्त

देवगड कोटकामते आडिवरेवाडी येथे घरासमोरील परिसरात (कंपाऊंड)अवैध गांजा पिकाची लागवड केल्याप्रकरणी  देवगड पोलिसांनी एका संशयितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sindhudurg Crime News Today

गुरूप्रसाद दळवी, प्रतिनिधी 

Sindhudurg Crime News : देवगड कोटकामते आडिवरेवाडी येथे घरासमोरील परिसरात (कंपाऊंड)अवैध गांजा पिकाची लागवड केल्याप्रकरणी  देवगड पोलिसांनी एका संशयितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ओंकार राजाराम कोतेकर (30) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कोतेकरकडून जवळपास 49 हजार रूपये किंमतीची 2 किलो 450 ग्रॅम वजनाचे ताजे ओलसर गडद हिरव्या रंगाचे,उग्र वासाचे 3 ते 5 फूट उंचीची गांजाची 23 झाडे देवगड पोलिसांनी जप्त केली आहेत.

अवैध धंदे व अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी अवैध धंदे व अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर,अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम,कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Nagpur Crime: नागपूर हादरलं! शांतिनगरमध्ये 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, पीडितेच्या पालकांना समजलं अन्..

या पोलीस पथकाने केली धडक कारवाई

संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात एनपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क),20 (ब),2 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे,पोलीस हवालदार महेंद्र महाडिक,पोलीस कॉन्स्टेबल गणपती गावडे,रवींद्र महाले,प्रसाद आचरेकर,डोईफोडे यांच्या पथकाने केली.