Dombivli Viral Video : डोंबिवलीत ठाणे-डोंबिवलीला जोडणारा माणकोली उड्डापूल हा स्टंटबाजांचा अड्डा बनला आहे या पूलावर कार रेसिंगसारखा धक्कादायक प्रकार सुरु असतो. यासंबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच एका नव्या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडीओत पाहू शकता की, मागे बसलेल्या तरुणाने दुचाकी चालकाचे हाताने डोळे झाकले. दुचाकी चालक बिंधास्तपणे दुचाकी चालवत आहे. लोकांच्या जीवाची पर्वा न करता फक्त रिल बनविण्यासाठी हा प्रकार केला गेला. व्हिडीओ व्हायरल होताच विष्णूनगर पोलिसांनी तीन तरुणांविरोधात कारवाई केली आहे. गणेश फोंडा रेड्डी,कबीर नेतकर आणि यश मालवणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही तरुण 22 वर्षांचे आहेत.
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा पूल धुरंधर चित्रपटाच्या शुटिंगमुळे चर्चेत आला. या पूलावर नशेखोरांचा हैदोस सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका उठवला. परंतु त्यानंतरही पुलावर भिवंडीच्या तरुणांकडून चार चाकी गाड्यांची स्टंटबाजी सुरु झाली. भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी या संदर्भात व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील या महामार्गावर गांजा तस्करांचा धुमाकूळ, पोलिसांना पांढऱ्या कारमध्ये सापडला 25 किलो गांजा
इथे पाहा तरुणांचा स्टंटबाजीचा भयंकर व्हिडीओ
अनेक वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली गेली. आता तर चक्क एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन तरुण एका दुचाकीवर बसले आहेत.दुचाकी चालविणारा तरुणाचे दोन्ही डोळे त्याच्या पाठी बसलेल्या तरुणाने झाकले आहेत. ज्या दुचाकी चालकाचे झोळे झाकले तो दुचाकी चालक बिनधास्तपणे दुचाकी चालवित आहे.त्याच्या मागे बसलेला तिसरा तरुण या स्टंटबाजीचे शूटिंग करीत आहे. याच वेळी पूलावर गाड्यांची रहदारी सुरु आहे.