जाहिरात

Pune News: पुण्यातील या महामार्गावर गांजा तस्करांचा धुमाकूळ, पोलिसांना पांढऱ्या कारमध्ये सापडला 25 किलो गांजा

दौंड तालुक्यातील धायगुडेवाडी येथे यवत पोलिसांनी गांजा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 29 किलो 600 ग्रॅम गांजा करण्यात आला आहे.

Pune News:  पुण्यातील या महामार्गावर गांजा तस्करांचा धुमाकूळ, पोलिसांना पांढऱ्या कारमध्ये सापडला 25 किलो गांजा
Pune Police Seized 25 KG Ganja
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Pune Crime News Today :दौंड तालुक्यातील धायगुडेवाडी येथे यवत पोलिसांनी गांजा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 29 किलो 600 ग्रॅम गांजा करण्यात आला आहे.एका चारचाकी बलेनो गाडीतून या गांजाची वाहतूक करण्यात येत होती. गोपनीय माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी कारवाई करीत 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी शाकीर शब्बीर पानसरे आणि समाधान शिवाजी दाभाडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलच्या समोर नाकाबंदी लावून पोलिसांनी केली कारवाई

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गुंगीकारक अंमलीपदार्थ गांजाचा माल सप्लाय होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडेवाडी गावाच्या हद्दीत एका हॉटेलच्या समोर नाकाबंदी लावून कारवाई केली. या नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून हा गांजा वाहतूक होत असल्याचे छापे मारीत निदर्शनास आले.

नक्की वाचा >> Mumbai News : मुंबईतील LPG गॅस सिलिंडर ग्राहकांना अलर्ट करणारी बातमी, कांदिवलीत घडली धक्कादायक घटना

या छापेमारीत 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा 29 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असेल पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.या  प्रकरणी शाकीर शब्बीर पानसरे (मूळ रा. तालमीसमोर येवलेवाडी,ता.हवेली जि.पुणे) या विरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

नक्की वाचा >> Beed News : "मी एकटा पडलो..", मित्रांनी बर्थडे पार्टीला बोलावलं नाही, तरुणाने स्टेटस ठेऊन भयंकर पाऊल उचललं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com