सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Crime News Today : शिर्डीत पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भर रस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शिर्डीतील सातभाई मळा परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी विकास जैस्वाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केलंय.या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय.
अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला अन्..
शिर्डी शहरातील सातभाई मळा परिसरात विकास जैस्वाल या व्यक्तीवर तीन अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, विकास जैस्वाल हे परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवत अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला.या हल्ल्यात विकास जैस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा >> Kalyan News: सावधान! शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवास करताय? एक्स्प्रेसमधील प्रवाशासोबत घडलं भयंकर
हल्ला करण्याचं नेमकं कारण काय?
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.हल्लेखोरांनी नेमका कोणत्या कारणातून हा हल्ला केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय.पोलीस पुढील तपास करत आहेत.