एका महिन्यात 5 हत्या करणारा सीरियल किलरला पकडण्यात पोलिसांनी यश आलं आहे. हा सीरियल किलर मुलींना आपलं लक्ष्य बनवत होता. आधी त्यांचे तो पैसे दागिने लुटत होता. त्यानंतर बलात्कार आणि हत्या असा त्याने सपाटा लावला होता. गुजरातमध्येही ही त्यांनी एका 19 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून हत्या केली होती. त्या प्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याला शोधण्यासाठी गुजरात पोलिसांनी तब्बल 2000 सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर या नराधमाला अटक करण्यात आली. राहुल करमवीर जाट असं या आरोपीचं नाव आहे. तो मुळचा हरियाणाचा रहिवाशी आहे. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी त्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे त्याने केले आहेत. त्यातून आणखी चार हत्या आणि बलात्काराचा उलगडा झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हरियाणाचा असलेला राहुल करमवीर जाट याला 24 नोव्हेंबरला गुजरातच्या वलसाड इथल्या वापी रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. याच्यावर गुजरातमधल्या एका 19 वर्षीय तरूणीचा खून आणि बलात्काराचा आरोप होता. आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. ती ऐकून पोलिसही आवाक झाले. आरोपीने एक महिन्याच्या काळात वेगवेगळ्या राज्यात फिरून आणखी चार जणांची हत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे यातील हत्या या त्याने रेल्वेमध्ये केल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी गुजरातमधील जवळपास 2000 हजार सीसीटीव्ही चेक केले. आरोपी हा पाचवी नापास आहे. त्याने गुन्हा ही कबूल केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ
आरोपी महिलांना टार्गेट करत होता. महिला एकटी दिसली तर तो त्यांना लुटत होता. त्यानंतर त्यांची हत्या करत होता. येवढ्यानेच त्याचे भागत नव्हते. तर तो त्यांच्या बरोबर बलात्कारही करत होता. आरोपी ही कृत्य धावत्या रेल्वेत करत. तो दिव्यांगांच्या डब्ब्यात प्रवास करत. त्याल पकडणेही अवघड होतो. कारण तो सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असत. शिवाय तो रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेमध्येच झोपत असत.
गुजरात मधील मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्या आधी आरोपीने आणखी चार जणांची हत्या केली होती. आरोपीला पकडण्या आधी एक दिवस त्याने तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकात एका महिलेची लुट केली. त्यानंतर तिची हत्या केली होती. त्या आधी महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकातही ट्रेनमध्येच त्याने एका महिलेवर बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली. अशाच पद्धतीने पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकात कटिहार एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका वरिष्ठ नागरिकाची चाकू मारून हत्या केली. त्याच बरोबर कर्नाटकातही त्याने अशीच हत्या केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?
या सीरियल किलरला पकडण्यासाठी गुजरात पोलिस प्रयत्न करत होते. त्यासाठी स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त अभियान राबवलं होतं अस पोलि अधिक्षक करणराज वाघेला यांनी सांगितलं. आरोपी हा आपली जागा नेहमी बदलत होता. तो नेहमी फरत रहायचा. तो एका सीसीटीव्हीतही दिसला. हत्या करताना त्याने जे कपडे घातले होते त्याच कपड्यात तो फिरताना दिसला. हत्या केल्यानंतर तो एका ठिकाणी जेवणाचा आनंद घेत असल्याचाही दिसला. तो ज्या हॉटेलमध्ये काम करत होता तिथे तो त्याचा पगार घेण्यासाठी आला होता. त्या आधीच त्यांने खून आणि बलात्कार केला होता. ती मुलगी क्लासवरून घरी येत होती त्यावेळी त्याने हे कृत्य केले.
आरोपी राहुल करमवीर जाट हा नुकताचे जेलमधून सुटून बाहेर आला होता. तो जोधपूर सेंट्रल जेलमध्ये होता अशी माहिती ही पुढे आली आहे. त्याच्यावर डाका टाकण्याचा गुन्हा होता. त्याच्या कुटुंबाने त्याला आपल्यापासून वेगळे केले आहे. तो पाचवी नापास झाल्यानंतर तो राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात डाके टाकायचा. त्याच्या विरूद्ध जवळपास 13 गुन्हे दाखल आहेत.