जंगलात हाडं गोठवणारी थंडी, आई-वडिलांच्या मृतदेहावर पहारा देत राहिला चिमुरडा; हृदयद्रावक घटना

Odisha News: हाडं गोठवणाऱ्या थंडीत पाच वर्षांचा लहानगा रात्रभर जंगलात आपले मृत वडील आणि आईजवळ बसून राहिला.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Odisha News : ओडिशाच्या देवगड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे हाडं गोठवणाऱ्या थंडीत पाच वर्षांचा लहानगा रात्रभर जंगलात आपले मृत वडील आणि आईजवळ बसून राहिला. सुर्योदय झाल्यानंतर तो मदतीसाठी रस्त्याच्या दिशेने पळत गेला. पाच वर्षांचा चिमुरडा घाबरला नाही, त्याने धाडस दाखवलं आणि अशा कठीण प्रसंगी उभा राहिला. हा पाच वर्षांचा चिमुरडा कडाक्याच्या थंडीत रात्रत ओडिशाच्या जंगलात मृत वडील आणि बेशुद्ध झालेल्या आईच्या शेजारी बसून राहिला. रविवारी सकाळी हा सर्व प्रकार समोर आला आहे. ही घटना ओडिशाच्या देवगड जिल्ह्यातील आहे. 

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं, मुलाचे आई-वडील दुष्मंत माझी आणि रिंकी माझी बाईकवरुन घरून निघाले होते. घरगुती वादातून त्यांनी किटकनाशकाचं औषध प्यायलं होतं. काही अंतरावर मुलाच्या वडिलांची बाईक थांबवली आणि मुलाला घेऊन साधारण एक किलोमीटर अंतरावर पायी चालत जंगलात गेले. येथे त्यांनी किटकनाशक औषध घेतल्याचा संशय आहे. 

नक्की वाचा - Sangli News: हृदयद्रावक! सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून तिघांचा मृत्यू; वाचवायला गेलेले 5 जणही गंभीर

रात्रभर मुलगा पाहारा देत राहिला...

देवगडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज चोपदार यांनी सांगितलं की, दुष्मंत याचा औषध घेतल्याच्या एका तासात मृत्यू झाला. तर पत्नी रिंकी बेशुद्ध झाली. तर जमिनीवर होता. मुलाने रात्रभर आई-वडिलांसाठी पहारा दिला आणि सुर्योदयानंतर रस्त्यावर येऊन मदतीची हाक दिली. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. 

Advertisement