छत्तीसगडमधील बेमेतरामध्ये बोलेरा-पिकअपच्या धडकेत मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं, 5 महिलांचा समावेश आहे. तर 20 हून अधिक जणं जखमी आहेत. ज्यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा बेमेतराच्या जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आणि एसपी रामकृष्ण साहू जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्याशिवाय स्थानिक आमदार दीपेश साहू यांनीही रात्री रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
नक्की वाचा - टेम्पो गाड्यांना उडवत गेला, वाडा भिवंडी महामार्गावर मृत्यूचं तांडव; तिघांचा मृत्यू
बेमेटारा जिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलेल्यांमध्ये भुरी निषाद (50 वर्षे), नीरा साहू (55 वर्षे) आणि गीता साहू (60 वर्षे) यांचा समावेश आहे. तर, सामुदायिक आरोग्य केंद्र सिमगा येथे मृत घोषित करण्यात आलेल्यांमध्ये अग्नी साहू (60 वर्षे), खुशबू साहू (39 वर्षे), मधु साहू (5 वर्षे), रिकेश निषाद (वय 5 वर्षे), ट्विंकल निषाद (६ वर्षे) यांचा समावेश आहे.