Ambernath News: अंबरनाथ अलर्ट मोडवर, भगतसिंग नगर परिसरात खळबळजनक घटना, आरोपी शरीफ शेखला अटक

अंबरनाथ पश्चिमेकडील भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले. यामुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या आरोपींचे धाबे चांगलेच दणाणलेत .

जाहिरात
Read Time: 2 mins
Heroin Seized In Ambarnath

Ambernath Crime News: अंबरनाथ पश्चिमेकडील भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले. यामुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या आरोपींचे धाबे चांगलेच दणाणलेत .अंबरनाथ विभागात नव्याने स्थापन झालेल्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने भगतसिंग नगरात छापा टाकत ही धडाकेबाज कारवाई केली. 

या प्रकरणी 17 गुन्ह्यांची नोंद असलेल्या शरीफ शेखला अटक करण्यात आली.नाव 'शरीफ'असले तरी त्याच्यावरचे आरोप मात्र समाजातील अनेक कुटुंबांच्या आयुष्याशी खेळणारे आहेत.शुक्रवारी सायंकाळी भगतसिंग नगर परिसरात आरोपी अमली पदार्थ विक्री करत असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. अमलीपदार्थ विरोधी पथकाने तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्याकडून 8 लाख 54 हजार रुपयांचे हेरॉईन,150 सोलेशन बॉटल आणि इतर साहित्य जप्त केले. भगतसिंग नगर परिसर पोलिसांसाठी नवीन नाही.

Advertisement

नक्की वाचा >> Baramati News: बारामतीत 'या' मार्गावर मोठा अनर्थ टळला, समोरून येणाऱ्या गाड्या कशाबशा वाचल्या, पाहा थरारक Video

आरोपीच्या नेटवर्कविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई

यापूर्वीही या भागात अमली पदार्थांविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या असून आरोपीच्या कुटुंबीयांवरही पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली होती.मात्र,तरीही अमली पदार्थांचा व्यवसाय सुरूच असल्याचे पोलीस तपासात समोर आले.आता या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या नेटवर्कविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्याची तयारी पोलीस करत आहेत .

.जर ही कारवाई झाली,तर अंबरनाथमधील अमली पदार्थांच्या रॅकेटविरोधातील ही सर्वात मोठी कायदेशीर कारवाई ठरू शकते.अंबरनाथ पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अशा मोहिमा आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.