घरातल्या कुत्र्याच्या मृत्यूने धक्का; 12 वर्षांच्या मुलीने स्वत:चा जीवच संपवला! 

आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं असा कुत्रा आपल्या आजूबाजूला दिसला नाही तर त्याची आठवण सतावत राहते. याच दु:खाचं रुपांतर नैराश्यात झाल्यानं एका 12 वर्षांच्या मुलीने आपला जीव संपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
हरियाणा:

घरातील पाळीव कुत्रा हा घरातील एक सदस्यच होऊन जातो. त्यांच्यावरही माणसाइतकाच प्रसंगी माणसांपेक्षाही जास्त जीव लावला जातो. अशा या मुक्या प्राण्याच्या अचानक जाण्याचा कुटुंबावर मोठा आघात होतो. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं असा कुत्रा आपल्या आजूबाजूला दिसला नाही तर त्याची आठवण सतावत राहते. याच दु:खाचं रुपांतर नैराश्यात झाल्यानं एका 12 वर्षांच्या मुलीने आपला जीव संपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे घरातील 12 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर 12 वर्षांची मुलगी दु:खी झाली होती. त्यातन तिने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती आहे. 

पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून मुलगी एका कुत्र्याच्या पिल्लाचा सांभाळ करीत होती. काही कारणास्तव कुत्र्याचा मृत्यू झाला.पाच दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील कुत्र्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने जेवणही टाकून दिलं होतं. कुटुंबीयांकडून मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ती कोणाचच ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. शेवटी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

शनिवारी सायंकाळी मुलीची आई आणि बहिण काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. याचवेळी मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या आईने सांगितलं की, तिचा तिच्या कुत्र्यावर खूप जीव होता. ती त्याची खूप काळजी घेत. शनिवारी मी बाजारात भाजी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारच्यांनी फोन करून लवकर घरी येण्यास सांगितलं. घरी आल्यावर पाहिलं तर माझ्या मुलीने आत्महत्या केली होती. 

नक्की वाचा - घरातील लेकीने ड्रायव्हरसोबत थाटला संसार; संतापलेल्या भावाचं धक्कादायक पाऊल


हेल्पलाइन 

तुम्हाला मदतीची गरज असेल किंवा ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, अशा व्यक्तीच्या संपर्कात असाल तर कृपया जवळील मानसोपचारतज्ज्ञाशी संपर्क करा. 

TISS iCall - 022-25521111 (सोमवार ते शनिवार - सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत)