खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भालचंद्र कल्लाप्पा तकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भालचंद्र कल्लाप्पा तकडे  असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याचे वय 44 वर्षे होते. त्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाच खाजगी सावकारांविरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भालचंद्र तकडे हे शिरोळमध्ये शेती करीत होते. परिसरातील काही सावकारांकडून त्यांनी शेतीसाठी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे परत मिळालेत यासाठी सावकारांकडून पैशाचा तगादा सुरू होता. त्यामुळे हा शेतकरी  तणावाखाली होता.  या तणावातून त्याने जुगुळ रस्त्यावरील शेतावर दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिट्ठी या शेतकऱ्याच्या खिशात आढळून आले. पोलिसांनी संबंधित चिट्ठी जप्त केली आहे. या प्रकरणाची माहिती राकेश श्रीपाल जगनाडे यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.

हेही वाचा - निवडणुकीत दारूचा महापूर! मोठी कारवाई, 1 कोटींची दारू, 75 लाखांचा गुटखा जप्त

या प्रकरणात पाच खाजगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठे गुलंद येथील रविकांत धनपाल जगताप, चंद्रकांत धनपाल जगताप तर शिरसाळ येथील बापू आप्पासो नाईक, विजय पापा नाईक, महादेव गणू नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.

Advertisement