लोकसभेची निवडणूक पाचव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर काही ठिकाणी मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या कालावधीत दारू, गुटखा आणि गांजाची मोठी आवाक होत होती. यावर नंदूरबार पोलिसांनी चाप लावत मोठी कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात नंदूरबार पोलिसांनी तब्बल पावणे दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात दारू आणि अमली पदार्थांचा सर्वास वापर झाल्याची जोरदार चर्चा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणुकीच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा अमली पदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारी 1 कोटी 37 लाख रुपयांची वाहने जप्त केली आहेत. नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमा भागावर आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवणे. अमली पदार्थांची होणारी तस्करी यावर लक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान नंदूरबार पोलिसां समोर असते. त्यात आता निवडणुका असल्याने नंदूरबार पोलिसांनी मोठी कावाई केली आहे. त्यासाठी सीमावरती भागांमध्ये 26 तपासणी नाके तयार करण्यात आले होते.
हेही वाचा - PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील हे मार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?
लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होऊ शकते याची कल्पना पोलिसांना होती. त्यामुळे त्यांनी कडकोट बंदोबस्त ठेवला होता. त्याला परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा आणि गांजा पोलीसांनी जप्त केला आहे. त्यात तब्बल 1 कोटींची दारू, 75 लाखांचा गुटखा, यासोबतच 60 हजारांचा गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे. तर सव्वा कोटींची एकूण 64 वाहन ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 4 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - चंद्राबाबू नायडूंच्या अडचणीत भर, बाभळी बंधारा आंदोलनात कोर्टाचा मोठा निर्णय
नंदूरबारमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान झाले. नंदूरबार लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होत आहे. काँग्रेसकडून गोवाल पाडवी तर भाजपकडून हिना गावीत या मैदानात होत्या. पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी प्रचार सभा घेतली होती. तर गावीत यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदूरबारला आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world