भारताचा शत्रू लष्कर-ए-तोय्यबाचा धोकादायक दहशतवादी अबू कताल सिंधी याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आहे. अबू कताल हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा राईट हँड असल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर स्थित झेलम जिल्ह्यातील दिना भागात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अबू कताल याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यातील दुसरी व्यक्की ही हाफिज सईद असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण होता अबू कताल?
हाफिज सईदचा भाचा अबू कताल हा लष्कर-ए-तोय्यबाचा टॉप कमांडर असून तो भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता. 26/11 हल्ल्यात अबू कताल मुख्यस्थानी होता. २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील झालेल्या तीर्थयात्रींच्या बसवर झालेल्या हल्ल्यासाठी अबू कताल जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता.