मृत्यू कुणाला कधी येईल हे सांगता येत नाही. मनी ध्यानी नसताना, चालत्या बोलत्या माणसाचं ही काय होईल याचाही नेम नाही. याचा प्रत्यय पालघरच्या बोईसरमध्ये आला आहे. त्याचा एक धक्कादायक आणि तेवढाच अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. चालता चालता एका महिलेला कारने उडवले. त्यात तिची काही चूक नव्हती.पण तरीही त्यात तिचा हकनाक बळी गेला. ही महिला 73 वर्षाची आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छायालता विश्वनाथ आरेकर या बोईसरच्या राहाणाऱ्या होत्या. त्यांचे वय 73 वर्ष होते. त्यांचे पती आजारी होते. त्यामुळे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करायच्या होत्या. त्यामुळे त्या पालघरच्या बोईसर येथील BARC म्हणजेच तारापूर अनुविद्युत केंद्र रहिवासी संकुल मध्ये आले होते. वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्या रुग्णालयातून बाहेर पडल्या.
रुग्णालयाबाहेर सर्व काही शांत होतं. छायालता या एकट्याच बाहेर येत होत्या. त्यावेळी समोरच्या बाजून एक कार पुढे येत होती. बघता बघता त्या कारने छायालता यांना धडक दिली. त्या बोनेटवर जोरदार आदळल्या. त्यानंतर गाडीने त्यांना पुढे फरफटत नेले. त्यानंतर गाडी थांबली. छायालता या गाडी खाली आल्या होत्या. त्या क्षणात कोसळल्या. त्यानंतर एकच धावपळ रुग्णालय परिसरात झाली.
ट्रेंडिंग बातमी - Chandrapur News: खाकीतली माणूसकी! 15 दिवसाच्या बाळाला 'तिच्या' एका कृतीने जिवनदान
ही सर्व अंगावर काटा आणणारी दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ही गाडी BARC च्या रुग्णालयातील डॉक्टर ए .के.दास चालवत होते. त्यांचे गाडीवरचे नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात वृद्ध महिला छायालता विश्वनाथ आरेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डॉक्टर दास यांना बोईसर पोलिसांनी यानंतर ताब्यात घेतले. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.