अ‍ॅड. मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणात तिघांना जन्मठेप; 10 वर्षांनी मिळाला न्याय

बालहक्क आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा अ‍ॅड. मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी, प्रतिनिधी

बालहक्क आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा अ‍ॅड. मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.तब्बल दहा वर्षांच्या सुनावणीनंतर या प्रकरणातील तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 


दोषी आरोपी आणि शिक्षा 


1. मनिंदर सिंग बाजवा – दुहेरी जन्मठेप आणि 70,000 रुपये दंड; दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास
2. विनायक चव्हाण – जन्मठेप आणि  70,000 रुपये दंड; दंड न भरल्यास 6  महिने अतिरिक्त कारावास
3. सुरज जयस्वाल – जन्मठेप आणि  70,000 रुपये दंड; दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास
4. सुरेंद्रकुमार बत्रा – आरोपी मृत

या खटल्यात फिर्यादी डॉक्टर संतोष जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली होती. अ‍ॅड. मीनाक्षी जयस्वाल यांची 2014 साली हत्या करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेचे कामकाज विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पाहिले, तर कोर्ट पेरवी पोलीस हवालदार अजित म्हात्रे यांनी केली.

Advertisement

( नक्की वाचा :  Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )

काय होते प्रकरण?

मीनाक्षी जयस्वाल या महिला आणि बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या. 18 डिसेंबर 2014 रोजी खारघर येथील वास्तू विहार सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. त्या वेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्यांचा चालक विनायक चव्हाण याने आपल्या साथीदार मनिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल यांच्या मदतीने घरात घुसून दरोड्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर 13 वेळा चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.

घटनेच्या दिवशी जयस्वाल यांचे पती, न्यायमूर्ती डॉ. संतोष जयस्वाल हे मालेगाव कोर्टात कार्यरत होते. पत्नीशी संपर्क न झाल्यामुळे त्यांनी काही मित्रांना घरी पाठवले. त्यावेळी मीनाक्षी जयस्वाल या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या.

Advertisement

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही, खारघर पोलिसांनी सखोल तपास करून परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध ठोस खटला उभारला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात 20 साक्षीदारांची साक्ष नोंदवून, आरोपींनी चोरीच्या उद्देशाने जयस्वाल यांचा खून केल्याचे सिद्ध केले. या प्रकरणाचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. शिंदे यांनी जाहीर केला. त्यांनी तिन्ही आरोपींना हत्येप्रकरणी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.