अडीच वर्षात 25 वेळा आई बनली महिला! 5 वेळा झाली नसबंदी, वाचा काय आहे प्रकार?

एका महिलेनं पाच वेळा नसबंदी केली होती. त्यानंतरही ती अडीच वर्षांमध्ये 25 वेळा आई बनली.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक अजब प्रकरण उघड झालं आहे. येथील एका महिलेनं पाच वेळा नसबंदी केली होती. त्यानंतरही ती अडीच वर्षांमध्ये 25 वेळा आई बनली. या महिलेला 45 हजारांची भरपाई देखील देण्यात आली आहे. जननी सुरक्षा आणि नसबंदी प्रोत्सहन अभियानात हा विचित्र प्रकार घडला आहे. आग्रामधील फतेहाबाद सीएससीनं नियमित ऑडिट केल्यानंतर या प्रकार उघड झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकार?

आरोग्य विभाग आणि आग्रामधील फतेहाबादच्या सीएससीनं आर्थिक वर्ष 2021-22 आणि 2022-23 चं ऑडिट केलं. हे ऑडिट करताना त्यांनी जी कागदपत्रं पाहिली ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या कागदपत्रानुसार एका महिलेला 25 वेळा गर्भवती आणि पाच वेळा नसबंदी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. इतकंच नाही तर या महिलेला प्रोत्साहन भत्ता म्हणून 45 हजार रुपये देखील देण्यात आले होते, असं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं दिलं आहे.  

हा सर्व प्रकार दलालांनी घडवून आणल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. दलालच महिलांच्या नावावं खातं उघडतात. खात्यामधील सर्व कागदपत्रं ही महिलांची असतात. पण, मोबाईल नंबर हा दलालाचा असतो. खात्यामध्ये पैसे जमा होताच त्याचा मेसेज दलालाच्या मोबाईलवर जातो. त्यानंतर दलाल ते पूर्ण पैसे काढून घेतात. 

( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )

या ऑडिटमध्ये ज्या महिलेच्या नावावर हा प्रकार झाला आहे त्या सिकरारा गावातील लाभार्थी आहेत. कृष्णा कुमारी असं या महिलेचं नाव आहे. सोमवारी हे प्रकरण उघड झाल्यानंतर सीएमओ डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कृष्णा कुमारी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी आपण कोणतंही खातं चालवत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Advertisement

एका व्यक्तीनं त्यांचं खात उघडलं होतं. ती व्यक्ती कधी-कधी तेल, रिफाइंड आणि धान्य देते अशी माहिती कृष्णा कुमारी यांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक ब्लॉकमधील टॉप 5 लाभार्थींची चौकशी करणार आहे. 

Topics mentioned in this article