जाहिरात

Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं!

प्रीती तिच्या प्रियकराला 'पती जी' म्हणून हाक मारत असे. एप्रिल 2023 मधील चॅटमध्ये प्रीतीनं त्या व्यक्तीचं नाव 'रिंकूजी' असं सांगितलं.

Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं!
मुंबई:

कुशवाह कुटुंबीयांसाठी तो नेहमीचा रविवार होता. त्यांची सर्वात लहान मुलगी प्रिती घरात एकटी होती. तिची भावंड, मोठा भाऊ आणि बहीण तसंच आई-वडील बाहेर होते. प्रितीनं संध्याकाळी आईला फोन केला. आपण घरी चपाती करत आहोत. तू ती खायला आलं पाहिजे, असा आग्रह तिनं केला. लाडक्या लेकीशी आपलं हे शेवटचंच बोलणं असेल, याची पुसटशीही कल्पना त्या माऊलीनं केली नव्हती. त्या घरी परतल्या त्यावेळी त्यांना प्रितीचा मृतदेह घरातील पख्यांला लटकलेला लटकला. प्रीतीनं तिच्या प्रियकारामुळे हे पाऊल उचललं असा आरोप कुशवाह कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रियकर तिचा दूरचा भाऊ असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भावाशी होते संबंध

18 वर्षांची प्रीती कुशवाह एका खासगी फर्ममध्ये काम करत होते. दोन वर्षांपूर्वी कुशवाह कुटुंब एका घरगुती कार्यक्रमासाठी त्यांच्या गावी गेले होते. तिथं प्रितीची भेट या मुलाशी झाली. तो तिचा दूरचा चुलत भाऊ होता. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली. त्यांनी गुप्तपणे एकमेकांशी लग्न केलं. हे गुप्त संबंध प्रीतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या लग्नाची गोष्ट उघड झाली. प्रीतीच्या मैत्रिणीनं तिचा कथित प्रियकराबरोबरच्या चॅटचे स्क्रीन शॉट तिच्या घरच्यांसोबत शेअर केले आहेत. 

( नक्की वाचा : नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला, बायकोच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवला आणि... )
 

'पती' जी म्हणून मारत होती हाक

प्रीती तिच्या प्रियकराला 'पती जी' म्हणून हाक मारत असे. एप्रिल 2023 मधील चॅटमध्ये प्रीतीनं त्या व्यक्तीचं नाव 'रिंकूजी' असं सांगितलं. एका फोटोमध्ये तिचा प्रियकर प्रीतीच्या कपाळामध्ये गंध लावत असल्याचं दिसत आहे. त्यामधून त्या दोघांनी लग्न केलं आहे, असं वाटत आहे. 

केस कापायला लावले

प्रीतीनं नुकतंच तिच्या प्रियकराच्या सांगण्यावर स्वत:चे सुंदर केस कापले. माझे केस खराब झाले आहेत, असं तिनं घरच्यांना सांगितलं. या विषयावर तिचा मोठी बहीण हिमानीबरोबर वाद झाला. प्रीती इतकी संतापली होती की तिनं तिचं स्वत:च मुंडण करण्याची धमकी दिली. त्यानंतर अखेर तिच्या भावानंच प्रीतीचं घरीच मुंडण केलं.

प्रीतीचा प्रियकर तिची अनेकदा प्रशंसा करत असे. तू खूप सुंदर आहेस, तुला आणखी कुणी आवडलं तर मी काय करु? असं तो तिला विचारायचा. त्यामुळे प्रीतीनं स्वत:चे केस कापले, अशी माहिती समोर आली आहे. 

( नक्की वाचा : शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आणि सुरु झाला खेळ! शाळेत बोलावलं आणि... )

प्रीती डिप्रेशनमध्ये होती

त्या व्यक्तीनं प्रीतीबरोबरचे सर्व संबंध तोडले होते. त्यानं तिचा नंबरही ब्लॉक केला होता. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. प्रीती डिप्रेशनमध्ये असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही समजत आहे. तो मला मेसेज करत नाही म्हणून काय झालं मी त्याची नेहमी आठवण करते,' असं तिनं 13 मार्च रोजी एका इन्स्टाग्राम पोस्टवरील व्हिडिओमध्ये म्हंटलंय. तर 'यापूर्वी फरक पडत होता. आता मी त्याच्याकडं पाहात देखील नाही,' असं 19 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओला प्रीतीनं कॅप्शन दिलं आहे. 

पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक केले होते ऑर्डर

प्रीतीनं आत्महत्या करण्यापूर्वी पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक ऑर्डर केले होते. तिनं आईला फोन केल्यानंतर तिच्या प्रियकराला देखील फोन केला होता. पण, काही उत्तर मिळालं नाही, अशी माहिती तिच्या फोन रेकॉर्डमध्ये मिळाली आहे. प्रितीच्या आत्महत्येला 10 दिवसांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यानंतरही त्या व्यक्तीच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

प्रीती घरात सर्वात लहान होती. ती सर्वांची लाडकी होती. तिची मैत्री दूर गावात झालेल्या तरुणाशी झाली आहे, हे आम्हाला तिनं 23 मार्च रोजी आत्महत्या केल्यानंतर समजलं, असं तिचा भाऊ दिपेशनं सांगितलं. तर त्या तरुणाच्या विरोधात पुरावे असूनही पोलीस का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न तिच्या आईनं विचारला आहे. प्रीतीचा मोबाईल मेलच्या माध्यमातून हॅक करुन त्यामधील डेटा डिलीट करण्यात आला आहे, असा दावा तिच्या घरच्यांनी केला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: