सुनील दवंगे, शिर्डी: शिर्डीमध्ये बाप-लेकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शिर्डीच्या विमानतळामागील बाजूस काकडे वस्तीवर घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. क्रुष्णा साहेबराव भोसले आणि वडील साहेबराव भोसले यांचा निर्घृण खून करण्यात आला असून या हत्याकांडाचे कारण अद्याप समोर आलेले नाही, पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारातील दिघे वस्तीवर रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरार घडला आहे. शेतातील वस्तीवर राहणारे भोसले कुटुंबावर अज्ञाताकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात बाप-लेकांची हत्या झाली असून आई गंभीर जखमी आहे.
मुलगा कृष्णा साहेबराव भोसले आणि वडील साहेबराव भोसले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. सकाळी डेअरीवर दुध गेले नाहीत म्हणून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत फ़ॉरेंसिंक टीमसह इतर पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; एका चुकीमुळे आरोपीचं बिंग फुटलं)
आरोपींनी शेतकरी कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीस वर्षीय कृष्णा साहेबराव भोसले आणि त्यांच्या वडील साहेबराव भोसले यांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपी दुचाकी घेऊन फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.