सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात एक थरकाप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड-को-हाळे शिवारात विहिरीत आढळले पाच मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या भयंकर घटनेनं पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
अरुण सुनील काळे (वय 35) असं या घटनेतील कथित आरोपीचं नाव आहे. अरुण त्याच्या पत्नीला कायम मारहाण करत असे. त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती. ही मुलं श्रीगोंदामधील मेहकरीमधील ही सर्व मुलं आहेत. ती अहिल्यानगर तालुक्यातील विरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होती.
पत्नी नांदायला येत नसल्यानं संतापलेलल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर आज सर्वांचे विहरीमध्ये मृतदेह आढळले. काळे मुलांची कटिंग करुन आणतो असं सांगून शाळेत गेला होता. तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले.
( नक्की वाचा : बॉयफ्रेंडसोबत पळण्यासाठी सर्व हद्द ओलांडली, आईनं दाबला 5 महिन्याच्या मुलीचा गळा )
धक्कादायक बाब म्हणजे मुलांना वडिलांच्या ताब्यात देऊ नका असं त्यांच्या आईनं शाळेत फोन करु नका असं सांगितलं होतं. पण तोपर्यंत शाळेनं मुलांना वडिलांच्या ताब्यात दिलं आणि पुढील अनर्थ घडला.
ही विहीर साधारण 50 फुट खोल आहे. त्यामध्ये 30 ते 35 फुट पाणी होते. बापासोबत सर्व मुलं या ठिकाणी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे असं या चिमुरड्यांची नावं आहेत. बापानं या सर्वांना विहरीत ढकलून स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. अरुण काळेचा एक हात आणि पाय बांधल्याचंही आढळलं आहे.