बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या SDRF ची बोट बुडाली; 3 जवानांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

इंदापूरातील भीमा नदी पात्रातील बोट बुडाल्यामुळे सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
अहमदनगर:

इंदापूरातील भीमा नदी पात्रातील बोट बुडाल्यामुळे सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाली आहे. नगरमधील प्रवरा नदीपात्रातील सुगाव बंधाऱ्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी बोटीत पाच जवान होते. पाचपैकी तीन जवानांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध घेतला जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात 22 मे रोजी दोघेजणं बुडाले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात यश आलं होतं. मात्र एका व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडला नव्हता. त्यामुळे आज सकाळी SDRF च्या टीमला बोलावण्यात आलं होतं.  बचावकार्यादरम्यान त्यांची बोट उलटली. यावेळी बोटीवर दहा जवान होते. यातील चौथ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकाची प्रकृती स्थिर आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध घेतला जात आहे.  

बातमी अपडेट होत आहे.