Akola News : आई शेजारी झोपलेली, अन् तो नराधम अत्याचार करीत राहिला; अकोला पुन्हा हादरलं!

काही दिवसांपूर्वीही अकोल्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुन्हा एकदा या प्रकारानंतर शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Crime : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर गणेश विसर्जन दिवशी 6 सप्टेंबर रोजी झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे जिल्हाभरात प्रचंड संताप उसळला होता. या घटनेविरोधात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच सकल हिंदू समाजाने आक्रोश मोर्चा काढून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली होती. नुकतेच आरोपीला अटकही करण्यात आली. या प्रकरणाची धग अजूनही ओसरलेली नसतानाच, अवघ्या काही दिवसांतच अकोल्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकं कसं घडलं प्रकरण!

शहरातील मोठी उमरी येथील परिसरात 10 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा नितीन रामकृष्ण खंडारे (वय 38) याने शेजारी राहणाऱ्या एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.

घटनेच्या रात्री आरोपी खंडारे हा मुलीच्या घरात शिरला. त्या वेळी मुलगी आणि तिची आई गाढ झोपेत होत्या. आरोपीने पीडित मुलीच्या तोंडावर रुमाल दाबला, घराचा दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या आणि तिचा गळा आवळला. त्यामुळे मुलीचा श्वास गुदमरू लागला. भीतीने घाबरलेल्या मुलीने धैर्य दाखवत तोंडावरील रुमाल दूर फेकला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पळ काढला. आरोपी देखील त्याचवेळी पसार झाला.

नक्की वाचा - जादूटोण्याच्या संशयावरून संभाजीनगरात खळबळ; बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर अघोरी कृत्य

प्रकरण उघड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आरोपी अटकेत..!

यानंतर पीडित मूकबधिर मुलीने खानाखुणांच्या माध्यमातून नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी नितीन खंडारे विरुद्ध 74, 75 (1), 333 या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत. सलग दोन गंभीर घटना घडल्याने अकोल्यात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article