Akola News : पती-पत्नी आणि 'ती'च्या वादामुळे एका आईचा जीव गेला! 14 वर्षांचा मुलगा पोरका; अकोल्यात खळबळ

Akola Crime News : अकोला शहरात 'पती-पत्नी आणि वो' या कौटुंबिक कलहामुळे एका 14 वर्षांच्या निष्पाप मुलाची आई असणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Crime News : या आरोपामुळे पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी, अकोला

Akola Crime News : अकोला शहरात 'पती-पत्नी आणि वो' या कौटुंबिक कलहामुळे एका 14 वर्षांच्या निष्पाप मुलाची आई असणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. मीरा मुरलीधर मानकर नावाच्या या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी पती मुरलीधर मानकर यांच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मीरा यांचा जीव गेल्याचा आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. खदान पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा आणि त्यांचे पती मुरलीधर उर्फ दीपक मानकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. या वादामुळे मुरलीधरने काही दिवसांपूर्वी घर सोडले होते आणि मीरा यांनी स्वतः खदान पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

मीरा यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार करताना असा गंभीर आरोप केला आहे की, मुरलीधरचे इतर महिलेसोबत संबंध होते. सततचा तणाव आणि या सर्व प्रकाराला कंटाळून मीरा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

( नक्की वाचा : Shocking: 'स्वीटी बेबी डॉल' बोलून चैतन्यानंद बाबा करत होता मुलींचा सौदा; व्हॉट्सॲप चॅटने उघड झाला 'डर्टी' खेळ )
 

 "ही आत्महत्या नाही, खून आहे!"

मीरा यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या माहेरच्या लोकांनी म्हणजेच सख्ख्या भावाने पती मुरलीधर मानकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मुरलीधरचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो मीराला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता.

Advertisement

माहेरच्या लोकांच्या दाव्यानुसार, पतीच्या याच छळाला कंटाळून मीरा यांचा जीव गेला आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा ठाम आरोप त्यांनीकेला आहे.  या आरोपामुळे पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.

खदान पोलिसांकडू तपास सुरू

मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.

Advertisement

मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या 'पती-पत्नी और वो' च्या आरोपामुळे एका निष्पाप 14 वर्षांच्या मुलाने आपल्या आईला गमावले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल (Post-mortem report) आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतरच ही आत्महत्या आहे की, हत्या, यावर नेमका प्रकाश पडेल.
 

Topics mentioned in this article