Akola Crime news: शेळीचं पिल्लू आणायला म्हणून गेली अन् चिमुकली बरोबर भयंकर घडलं

शेळीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले. शेळीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुरडी त्या घरात गेली.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

कल्याण,पुण्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता अकोल्यातही सर्वांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर गुरुवारी सायंकाळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. अकोल्यातल्या पातूर पोलिस ठाणे अंतर्गत एका गावातील नऊ वर्षीय मुलगीवर अत्याचार करण्यात आले. अत्याचार करणारा व्यक्ती 55 वर्षाचा होता. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर इथं घडली आहे. ही चिमुकली नऊ वर्षांची आहे. ती घराजवळ शेळीच्या पिल्लांसोबत खेळत होती. शेळीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले. शेळीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुरडी त्या घरात गेली. त्यावेळी घरात गवई नावाच एक इसम होता. तो जवळपास 55 वर्षाचा होता. घरात त्यावेळी कोणी नव्हते. मुलगी घरात घुसल्याचे पाहून त्या नराधमाने तिच संधी साधली. 

ट्रेंडिंग बातमी - Viral video: हॉर्न वाजवण्यावरून महानाट्य, रागाच्याभरात गाडीच्या टपावर चढला अन्...

घरात कोणी नाही याचा गैरफायदा त्याने घेतला. या नऊ वर्षीय चिमुकलीला पकडून त्याने तिच्यावर अत्याचार केला. झालेली घटना कोणाला सांगितली तर तुला ठार मारेन अशी धमकी तिला देण्यात आली. त्यानंतर ती चिमुरडी तिथून पळून गेली. घरी गेल्यानंतर तिला वेदना होत होत्या. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली. तिने तिला काय झालं आहे याची विचारणा केली. तिला विश्वासात घेतलं. 

ट्रेंडिंग बातमी - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल

आईने विश्वासात घेतल्यानंतर तिने झालेली सर्व हकीगत आईला सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तिच्या कुटुंबीयांनी लगेच पातूर पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर आरोपी विरोधात तक्रार दिली. दरम्यान पातूर ठाणेदार धोपेवाड यांच्या पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन तळसे यांनी लगेच आरोपीचा शोध घेतला. त्याला गावापासून जवळच असलेल्या शेतातून ताब्यात घेतलं. याप्रकरणी पातूर पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.