राजकारणात कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. त्याचाच एक प्रत्यय सध्या तामिळनाडूतल्या राजकारणात पाहायला मिळत आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अण्णामलाईन यांनी डीएमके सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय संताप म्हणून स्वत: चाबकाचे फटकेही मारून घेतले आहेत. ते तेवढ्यावर थांबले नाहीत. तर जोपर्यंत डीएमके सरकार जात नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. अनवाणी फिरणार असल्याचा पण त्यांनी केला आहे. डीएमके सरकार चेन्नईतल्या अण्णा विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे अण्णामलाई यांनी हे पाऊल उचलले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेन्नई अण्णा विद्यापिठ आहे. या विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात डीएमके सरकार अपयशी ठरलं आहे. याचा निषेध म्हणून आपण स्वत:ला सहा चाबकाचे फटके मारणार असल्याचे भाजप नेते अण्णामलाई यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी उघड्या अंगावर चाबकाचे फटकेही मारले. पण त्यांच्या समर्थकांना ते पहावलं नाही. त्यांनी ते फटके मारत असतानाच त्यांना घट्ट मिठी मारली. त्यानंतर त्यांच्या हातातला चाबूक काढून घेतला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी डीएमकेची सत्ता उलथवून टाकण्याची शपथ घेतली आहे.
डीएमके सरकार घालवण्याची शपथ तर त्यांनी घेतलीच आहे. पण त्याच बरोबर जो पर्यंत डीएमके सरकार जात नाही तोपर्यंत ते पायात चप्पल घालणार नाहीत. शिवाय अनवाणी फिरणार असल्याचं ही त्यांनी जाहीर केलं आहे. अन्नामलाई यांनी त्यांच्या घराच्या बाहेर स्वताला चाबकाचे फटके मारून घेतले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही कृती केली. अण्णा विद्यापिठात विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केले जात आहे. त्या मागे डीएमकेचा पदाधिकारी असल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र डिएमकेने हा आरोप फेटाळून लावला आहे.
अण्णामलाई यांनी आरोपी बरोबर डीएमकेच्या नेत्याचा फोटो सार्वजनिक केला आहे. शिवाय तो डीएमकेच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र कायदा मंत्री एस. रघुपति यांनी लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी हा द्रमुकचा प्राथमिक सदस्य ही नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान हा आरोपी द्रमुकचा असल्यानेच त्याच्यावर कारवाई केली गेली नाही असं भाजपनं म्हटलं आहे.
या प्रकरणात जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यावरही भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जी तक्रार लिहीली आहे त्यात पिडीतानेच काही तरी अपराध केला आहे असं लिहीण्यात आलं आहे. शिवाय पिडीतेची ओळखही द्रमुकने सार्वजनिक केल्याचा भाजपचा आरोप आहे. याच वेळी अन्नमलाई यांनी द्रमुक सरकार घालवण्याची शपथ घेतली आहे. शिवाय पुढचे काही दिवस व्रत करणार असल्याचेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world