Crime News: 'माझ्या मैत्रिणीकडे का बघतोस?' प्रेम प्रकरणातून तरुणावर प्राणघातक हल्ला

अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरूण करण चितळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

माझ्या मैत्रिणीकडे का बघतोस? अशी विचारणा करत दोन मित्रांनी एका 22 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना अकोला शहरातील जेतवननगरात घडली आहे. हल्ल्या मध्ये तरुण जबर जखमी झाला आहे. तर हल्लोखोर हल्ला केल्यानंतर तिथून फरार झाले आहेत. संध्याकाळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय भितीचे ही वातावरण पसरले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरूण करण चितळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन आरोपींनी चाकूने भोसकून करण चितळे याला गंभीर स्वरूपात जखमी केले. प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपी फरार झाले आहे. करण सोबत त्याचा एक मित्रही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Aamir Khan: 'आम्हाला थोडी भीतीच वाटते' आमिर खान मुख्यमंत्री फडणवीसांसमोर असं का बोलला?

त्या दोघांना ही जखमी अवस्थेत तातडीने अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले. त्यांना शोधण्यासाठी पोलीसांची नाकेबंदी केली आहे. ऐन संध्याकाळच्या सुमारास हल्लेच्या घटनेने खदान परिसर खळबळ उडाली आहे. हल्लेखोर करण चितळे याचेचं मित्र असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून हा हल्ला करण्यात आला.  

ट्रेंडिंग बातमी - Hamid Engineer: मोदींना भेटले, प्रकाशझोतात आले, आता दंगलीसाठी अटक, 'ते' हमीद इंजिनिअर कोण?

या हल्लात एक हल्लेखोरही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याच्याच मदतीने आता हल्लेखोरांना शोधले जात आहे.  हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातल्या जेतवन नगर भागात घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहे. हा भाग मुख्य शहराचा भाग समजला जातो. तिथे ही घटना घडल्याने नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Advertisement