Akola News: तरुणींना रस्त्यावर फिरणं झालं कठीण, 'त्या' घटनेचा अखेर छडा, 200 सीसीटीव्हीमुळे गेम फिरला

विषय गंभीर असल्याने पोलीस अॅक्शन मोडवर आले. त्यांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

योगेश शिरसाट 

दोन तरुणी क्लाससाठी म्हणून चालल्या होत्या. त्याच वेळी त्यांची भर रस्त्यात छेड काढण्यात आली. ऐवढेच नाही तर अश्लिल शेरेबाजीही करण्यात आली होती. अकोल्याच्या जवाहर नगर परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर आरोपी ही फरार झाला. मात्र त्याचे पडसाद शहरात उमटले. पोलीसांवर ही दबाव आला. अशा घटना होत असल्याने शहरात मुली सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी पोलीसांनी एक दोन नाही तर जवळपास 200 च्या आसपास सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून त्यांना एक लिड मिळाली. तीच लिड आरोपीपर्यंत पोहण्यास पुरेशी ठरली. 

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला अखेर सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. 15 फेब्रुवारीला बाईकवरून आलेल्या एका टवाळखोराने  मुलीची छेडछाड केल्याची संतापजनक घटना घडली होती. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या घरासमोर ही घटना घडली होती. सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अखेर 3 दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. 

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: 'आम्हाला भांडी घासावी लागली' पाकिस्तानी खेळाडूंची लाज निघाली, कॅप्टननेच केला गंभीर आरोप

सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मालती  कायटे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मुली कोचिंग क्लासला जात होत्या. त्या अकोल्यात रूम घेवून राहात होत्या. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्या ज्यावेळी क्लाससाठी निघाल्या त्यावेळी दुचाकीवरून एक मुलगा आला. त्याने आधी रेकी केली होती. मुली बाहेर आल्यानंतर त्याच्या समोरून तो मुलगा आला. त्याने अश्लील कृत्य केले. अश्लील शेरेबाजी ही केली. नंतर तिथून पळ काढला. याची माहिती मुलींनी क्लासच्या संचालकाना दिली. मग गुन्हा दाखल झाल्याचे कायटे यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Pune News: बुधवार पेठेत मध्यरात्री पोलीस धडकले, 11 महिलांच्या बॅगेत असं काही आढळलं, 22 जण ताब्यात

विषय गंभीर असल्याने पोलीस अॅक्शन मोडवर आले. त्यांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. जवळपास 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातील एकामध्ये आरोपी दुचाकीवर दिसला. त्या दुचाकीचा क्रमांक मिळवण्यात आला. त्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले असं मालती कायटे यांनी सांगितले. रात्री तीन वाजताच्या सुमारास या मुलाला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान दामिनी पथक 24 तास कार्यरत ठेवून या भागात नियमित गस्त घालण्याची मागणीही नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केली आहे.