जाहिरात

Pune News: बुधवार पेठेत मध्यरात्री पोलीस धडकले, 11 महिलांच्या बॅगेत असं काही आढळलं, 22 जण ताब्यात

बुधवार पेठ परिसरात अवैध रित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी फरासखाना आणि खडक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. 

Pune News: बुधवार पेठेत मध्यरात्री पोलीस धडकले, 11 महिलांच्या बॅगेत असं काही आढळलं, 22 जण ताब्यात

सुरज कसबे, पुणे:

Pune Budhvar Peth News: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले होते. या ऑपरेशननंतर बुधवारी रात्री पोलिसांनी पुन्हा एकदा शोधमोहिम राबवली.  शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेत ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पुण्यातील बुधवार पेठेत सर्जिकल स्ट्राईक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन झाल्यानंतरही 11 बांगलादेशी महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईचा आढावा घेतला आहे. बुधवार पेठ परिसरात अवैध रित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी फरासखाना आणि खडक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. 

Amravati Accident: शिवाई बस- रिक्षाचा भयंकर अपघात! शाळकरी मुलांसह चौघांचा मृत्यू; अक्षरश: चेंदामेंदा झाला

22  महिला ताब्यात

या ऑपरेशनदरम्यान संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या महिलांची चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे समोर आले. या कारवाईत एकूण 22 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांकडे भारताचे वैध व्हिसा किंवा वास्तव्याचे परवाने आहेत का, याची कसून तपासणी करण्यात आली, या महिलांनी बेकायदेशीर मार्गाने सीमा ओलांडून प्रवेश केला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

चौकशीअंती जर या महिला दोषी आढळल्या, तर त्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे पुन्हा त्यांच्या मूळ देशात म्हणजेच बांगलादेश मध्ये पाठवण्याची तरतूद केली जाणार आहे. दरम्यान बुधवार पेठेत वारंवार बांगलादेशी नागरिक सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलीस प्रशासन आता या महिलांच्या स्थानिक संपर्कांचीही चौकशी करत आहे.

Rohit Pawar: 'अजित पवारांच्या विमानाची गॅरंटी संपलेली, फक्त 85 तास..', रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

"मी सुरुवातीला म्हणालो होतो बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत. त्यावर कारवाई केली जाणार सांगितले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. काल रात्री कारवाई करण्यात आली, यात ११  बांगलादेशी महिला सापडल्या.  एकूण २२ महिला आम्ही ताब्यात घेतल्या. बुधवार पेठ परिसरात अश्या हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे.जे जे बेकायदेशीर आहे, सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल.  बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com