Akola News : भयंकर! रुग्णवाहिका कुत्र्याला धडकली, संतापलेल्या मालकानं पेशंटचा जीव घेतला!

Akola News : आपला कुत्रा चिरडला गेल्यानं त्याचा मालक चांगलाच संतप्त झाला. त्यानं थेट रुग्णवाहिकेची चाबी काढली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News : या सर्व प्रकारात रुग्णवाहिकेतील पेशंटचा जीव गेला.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका गंभीर पेशंटला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गात एक कुत्रा आडवा आला. रुग्णवाहिकेची कुत्र्याला धडक बसली. आपला कुत्रा चिरडला गेल्यानं त्याचा मालक चांगलाच संतप्त झाला. त्यानं थेट रुग्णवाहिकेची चाबी काढली. रुग्णालयाच्या चालकानं वारंवार विनंती करुनही कुत्र्याच्या मालकाचं समाधान झालं नाही. या सर्व प्रकारात रुग्णवाहिकेतील गंभीर पेशंटचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर शंकर लालू मिटकर या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

अकोल्यातील रुग्णवाहिका चालक सुखदेव मालठाणकर यांना अकोट नगरपालिकेतून एक कॉल आला होता. अकोट नगरपालिकेतील एक कर्मचारी गंभीर जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये तातडीनं  घेऊन जाण्याची विनंती या कॉलमध्ये करण्यात आली होती. 

या कॉलनंतर मालठाणकर यांनी तातडीनं अकोट गाठले आणि ते जखमी पेशंटला घेऊन अकोल्याच्या दिशेनं निघाले. त्याचवेळी अकोल्याच्या चोहोट्टा बाजारमध्ये त्यांची रुग्णवाहिका एका कुत्र्याला धडकली. त्यात तो कुत्रा चिरडला गेला. त्यामुळे या कुत्र्याचा मालक  शंकर लालू मिरटकर चांगलाच संतापला. 

( नक्की वाचा : Akola News : ट्रकच्या धडकेत ऑटो पलटी, प्रवासी फेकले गेले! 2 जण जागेवरच ठार )
 

मिटकरनं या रुग्णवाहिकेचा दोन किलोमीटर पाठलाग केला. त्यानं मालठणकर यांना 'माझ्या कुत्र्याला तू चिरडले आणि त्याला दवाखान्यात घेऊन चल', अशी ऑर्डर केली. मिटकर इतक्यावरच थांबला नाही. त्यानं रुग्णवाहिकेची चाबी काढून घेतली. 

Advertisement

रुग्णवाहिकेत गंभीर पेशंट आहे, आम्हाला जाऊ दे अशी विनंती मालठणकर यांनी केली. पण मिरटकरवर काहीही परिणाम झाला नाही. या सर्व प्रकाराच बराच वेळ गेल्यानं रुग्णवाहिकेतील पेशंटचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर अकोलामध्ये खळबळ उडाली आहे. 

( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
 

दरम्यान, या प्रकरणात अकोल्याच्या  चोहोट्टा बाजार पोलिस चौकी मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुग्णवाहिका चालकाला मारहाण करणाऱ्या मिरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलंय. मिरटकरला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article