Akola News: प्रेमापोटी नवऱ्याला सोडलं, प्रियकराला पकडलं! लिव्ह इनमध्ये राहाणाऱ्या तरुणीसोबत भयंकर घडलं

आत्महत्येपेक्षा ही घटना काहीतरी वेगळीच असल्याची बाब पोलिसांना तपासात लक्षात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

योगेश शिरसाट 

जिल्ह्यातील अकोट शहरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेचा तिच्याच प्रियकराने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या या जोडप्यात गेले काही दिवस वादविवाद वाढले होते. या वादाची परिणती थेट महिलेच्या मृत्यूत झाली असून संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. महेश कॉलनीत राहणारा पवन लक्ष्मण इंगळे आणि विवाहित महिला हे दोघं काही काळापासून एकत्र राहत होते. मात्र सात डिसेंबरच्या रात्री हा संबंध भीषण स्वरूपात संपला.

प्रियकराचा बनाव
अकोटात घटना झाल्यानंतर पवन इंगळे सरळ अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गेला. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कहाणी त्याने पोलीसांना सांगितली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मात्र परिसरातील वातावरण आणि मृतदेहावरील काही खुणांमुळे पोलिसांच्या मनात संशय पक्का झाला. आत्महत्येपेक्षा ही घटना काहीतरी वेगळीच असल्याची बाब पोलिसांना तपासात लक्षात आली.

नक्की वाचा - Shocking news: प्रेयसी प्रेग्नंट झाली, कुटुंबीयांना खबर लागली, तरुणाला लग्नाच्या बोलणीसाठी बोलवलं अन् पुढे...

पोस्टमार्टम अहवालानं बिंग फोडलं
उत्तरीय तपासणीचा अहवाल येताच पोलिसांचा संशय वास्तवात बदलला. महिलेचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यातून आत्महत्येचा मुद्दा पूर्णपणे बाद झाला. पोलिसांनी क्षणाचाही वेळ न दवडता पवनला ताब्यात घेत कठोर चौकशी केली. काही वेळ टाळाटाळ केल्यानंतर अखेरीस पवनने महिलेचा गळा आवळूनच खून केल्याची कबुली दिली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

नक्की वाचा - Pune News: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! कोणता पक्ष उमेदवारी देणार? कोर्टात काय घडलं?

तणावग्रस्त नात्याचा शेवट
पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले की विवाहित महिला प्रेमापोटी आपल्या पतीला सोडून पवनसोबत राहत होती. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र नंतर सततचे वाद, भांडणं, संशय आणि मानसिक छळ वाढू लागला. पवननेही या सर्व तणावामुळे रागाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर लिव्ह-इन संबंधातील वाढत्या तणावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी पवनला न्यायालयात हजर केले असता  11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, वैभव तायडे, एएसएस अनिल वक्टे, पोहेकॉ नंदकिशोर कुलट, ना.पो.का. विपुल सोळंके, पो.कॉ. विशाल दारोकार, चालक पोकॉ संदीप तायडे, सुरेश माकोडे यांनी केली.

Advertisement