प्रेमासाठी कोणती ही किंमत मोजण्याची तयारी अनेकांची असतात. काही जण शेवटपर्यंत प्रमाणिक राहातात तर काही जण फसवणूक करून नामानिराळे राहतात. तर काहींची प्रेम कहाणी वेगवेगळ्या कारणाने अधुरी राहते. अशीच एक सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेत प्रामाणिक पणे प्रेम करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाच्या पदरी त्याने कधी विचार ही केला नसेल अशी गोष्ट पडली. ही घटना सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. ही घटना आंध्र प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे.
काय आहे नेमके प्रकरण? (What exactly is the case?)
ज्योती श्रीवन साई उर्फ शिवा हा 19 वर्षाता तरुण आहे. तो आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलू गावचा रहिवासी होता. तो मेडचल जिल्ह्यातील सेंट पीटर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. श्रीवन आणि श्रीजा (19) हे दोघेही दहावीपासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हा पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याची दोन्ही कुटुंबांना माहिती होती. मात्र श्रीजाच्या कुटुंबाचा या नात्याला सतत विरोध होता. मात्र विरोधानंतर ही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांना लग्न करायचे होते.
श्रीजाच्या कुटुंबाचा विरोध (Shreeja's Family Opposition)
श्रीजाच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही अनेकदा समज दिली होती. शिवाय त्यांच्या लग्नाला विरोध ही केला होता. परंतु, नुकतेच श्रीजा ही 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे श्रीजाच्या घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यानंतर, मंगळवारी श्रीजाच्या आई-वडिलांनी श्रीवनला लग्नासंदर्भात बोलण्यासाठी घरी बोलावले. श्रीवन ही सकाळी 10.30 वाजता त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी श्रीजाची आई सीरी हिने गर्भधारणेच्या विषयावरून त्याच्यासोबत वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर सीरी आणि इतर कुटुंबीयांनी श्रीवनवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला.
जबर मारहाणा करण्यात आली
तेलंगणामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गर्भवती प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या बोलणीसाठी त्याला घरी बोलावले. त्यानंतर त्याला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली, असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाय आणि बरगड्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले. मंगळवारी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गंभीर दुखापती आणि मृत्यू (Serious Injuries and Death)
या हल्ल्यात श्रीवनच्या डोक्याला, पाठीला आणि खांद्याला दुखापत झाली. त्याचे पाय आणि बरगड्यांची हाडेही फ्रॅक्चर झाली. श्रीवनला कुकटपल्ली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु बुधवारी पहाटे 6.30 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता आणि कुतबुल्लापूर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तर श्रीजा बीसीएच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world