अकोला: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या, घरगुती हिंसाचारातून मारहाणीच्या घटना समोर येत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच अकोल्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यामध्ये माय-लेकीला पत्र्याला छीद्र पाडून घरात घुसून अब्रु लुटण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धमकीनंतर माय-लेकीने न्याय मिळवण्यासाठी आणि धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
अकोल्याच्या पातुर तालुक्यातील अंबाशी येथे उपोषणकर्त्या वैशाली मानकर आणि वृद्ध आई व दोन मुली अंबाशी गावात राहत आहेत. पती शेगाव संस्थान येथे कामाला असुश मुलगा हा अकोला येथे खाजगी काम करतो. 15 ऐप्रील 2025 रोजी त्यांना सोनाजी दाभाडे या व्यक्तीने रात्री साडे अकरा वाजताचे घराच्या भींती व पत्र्याला छीद्र पाडुन अब्रु लुटतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या दरम्यान, वैशाली मानकर यांनी पातुर पोलीस ठाण्यात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही केली नाही. अन्यायग्रस्त माय लेकीने शेवटी अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा - मोठी कारवाई! मोठं गुप्तहेर प्रकरण उघड, थेट ISI कनेक्शन समोर