Akola News: केवळ मोबाईल नाही तर ऑनलाईन बँक बॅलन्सवरही डल्ला; अकोल्यातील जबरी चोरीचं गूढ उकललं

Akola News:  अकोला पोलिसांनी एका धाडसी कारवाईत शहरात खळबळ उडालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Crime News : आरोपींनी केवळ खिशातील रोकड आणि मोबाईलच लुटला नाही, तर ...
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News:  अकोला पोलिसांनी एका धाडसी कारवाईत शहरात खळबळ उडालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. चाकूचा धाक दाखवून भररस्त्यात लूट करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा मालही हस्तगत केला आहे. अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, अकोलेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना 7 एप्रिल 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तुकाराम चौक परिसरात घडली होती. फिर्यादी आपल्या घरी जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले आणि मलकापूर रोडवरील एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्यांना मारहाण करत लोखंडी चाकूचा धाक दाखवण्यात आला. 

Advertisement

विशेष म्हणजे, आरोपींनी केवळ खिशातील रोकड आणि मोबाईलच लुटला नाही, तर फिर्यादीला फोन-पे अ‍ॅप वापरण्यास भाग पाडून ऑनलाईन पद्धतीने 30,180 रुपयांची खंडणी उकळली. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.

( नक्की वाचा : Akola News: चिमुकलं बाळ रुग्णालयात, आईची हत्या अन् बाप पोलीस कोठडीत; अकोल्यातील त्या हत्येमागील सत्य उघड )
 

अकोला पोलिसांचा तांत्रिक तपास आणि कारवाई

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खदान पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अभिजित रामेश्वर हिंगणे (वय 29) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला साथीदार अमित गवळी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफिल्ड मोटारसायकल, विवो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

( नक्की वाचा : Solapur News : 14 वर्षांची नवरी, 19 वर्षांचा नवरा, 4 महिन्यातच सारा खेळ संपला! प्रकरण वाचून अंगावर येईल काटा )

फरार आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजित हिंगणे सध्या पोलिसांच्या ताब्यात असला, तरी त्याचा साथीदार अमित गवळी हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने यशस्वी केली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article