Dr. Prashant Javarkar : मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मानसिक तणावातून आत्महत्या, वैद्यकीय वर्तुळात खळबळ

शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

अकोला शहरातील सन्मित्र रुग्णालयात कार्यरत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅनस्थेशियाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 

स्वतः समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांनीच आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. या डॉक्टराच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. प्रशांत जावरकर यांनी न्यु तापडियानगर येथील स्वतःच्या राहत्या घरी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा - Beed Crime: तुला नीट वापस जायचं आहे का? डांबून ठेवत एकाला बेदम मारहाण; बीडमधील वारकरी सांप्रदायाच्या शाळेतील प्रकार

Advertisement

अनेक वर्षांपासून डॉ. प्रशांत जावरकर हे डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसिक तणावाने ग्रस्त रुग्णांचे समुपदेशक म्हणून काम करत होते. दरम्यान मृत डॉक्टर हे अमरावती येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून डॉक्टरच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.