Akola News : शाळेत पाप घडलं! अकोल्यात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत संतपाजनक कृत्य; गावकऱ्यांनी दिला चोप

Akola News : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसुर परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
अकोला:


योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

Akola News : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसुर परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  आरोपी शिक्षक सुधाकर पांडे याला चान्नी पोलिसांनी ॲरेस्ट (Arrest) केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हा अनुचित प्रकार साधारण सहा दिवसांपूर्वीच शाळेच्या परिसरात घडला. आरोपी शिक्षक सुधाकर पांडे याने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केले.

घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. या घटनेने संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. आज (मंगळवार, 11 नोव्हेंबर) या घटनेची माहिती उघडकीस येताच चान्नी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सुधाकर पांडे याला अटक केली.

( नक्की वाचा : Akola News : अकोला महापालिकेच्या नावाने मेसेज; 10 रुपये भरले आणि महिलेचं बँक खातं रिकामं! काय आहे प्रकरण? )

ग्रामस्थांचा संताप, शिक्षकाला चोप

या घटनेची माहिती मळसुर आणि आलेगाव परिसरातील ग्रामस्थांना मिळताच तीव्र संताप उसळला. अनेक नागरिकांनी एकत्र येत आरोपी शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.

Advertisement

संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या परिसरात मोठी गर्दी केली आणि अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणामुळे परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था (Additional Security) तैनात केली आहे.

( नक्की वाचा : Buldhana News : डोळ्यांदेखत कोळसा ! बुलडाण्यात गर्भवती पत्नीचा पतीसमोरच होरपळून मृत्यू )

गुरु-शिष्य' परंपरेत शिक्षकाला आदर्श व्यक्ती मानले जाते. मात्र, या लाजिरवाण्या कृत्यामुळे समाजमन मोठ्या प्रमाणात संतप्त झाले असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Advertisement

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना पालक आणि स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, “शिक्षक ही विद्यार्थ्यांसाठी आदर्श असणारी व्यक्ती असते. अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे.” या प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चान्नी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास (Investigation) सुरू केला आहे.


 

Topics mentioned in this article