Akshay Kumar daughter incident : इंटनेटचा प्रसार वाढल्यानं त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. अनेक कामं ही सोपी झाली आहेत. त्याचबरोबर याचा वापर गुन्हेगारी कामासाठी देखील करण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. ऑनलाईन मार्गानं पैशांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' या सारखे प्रमाण सातत्यानं उघड होतात. त्याचबरोबर अल्पवयीन मुलांनाही इंटनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकरे लक्ष्य करण्यात येते. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या 13 वर्षांच्या मुलीबाबत आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
ऑनलाइन गेममध्ये 'नग्न चित्रांची' मागणी
अक्षय कुमारने शुक्रवारी (3 ऑक्टोबर 2025) सायबर जागृती महिना 2025 च्या उद्घाटन समारंभात बोलताना त्याच्या 13 वर्षांच्या मुलीसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग उघड केला. एका ऑनलाइन व्हिडिओ गेममध्ये तिच्याकडे 'नग्न छायाचित्रे' (Nude Pictures) मागण्यात आल्याचे त्याने सांगितले.
मुंबईतील राज्य पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. अक्षय कुमारने उपस्थित मान्यवरांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी एक ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत होती. या गेममध्ये अनोळखी व्यक्तीसोबत खेळण्याचा पर्याय असतो.
( नक्की वाचा : : 'रावणाने महिलेचा सन्मान केला, खासदारांनी...?' दसऱ्याच्या दिवशी अभिनेत्रीनं लिहलं वादग्रस्त पत्र )
हा प्रसंग सांगताना अक्षय कुमार म्हणाला, "काही महिन्यांपूर्वी माझ्या घरात घडलेली एक छोटी घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझी मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती. काही व्हिडिओ गेम्स असे असतात जे तुम्ही कोणासोबतही खेळू शकता. म्हणजे तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसोबत (Unknown Stranger) खेळत असता."
तो पुढे म्हणाला, "तुम्ही गेम खेळत असताना कधीकधी तिकडून मेसेज येतो... मग एक मेसेज आला, 'तू मुलगा आहेस की मुलगी?' तिने उत्तर दिले, 'मुलगी.' आणि लगेच त्याने दुसरा मेसेज पाठवला, 'तू मला तुझी नग्न छायाचित्रे (nude pictures) पाठवू शकतेस का?' ती माझी मुलगी होती. तिने लगेच तो गेम बंद केला. माझ्या पत्नीला याबद्दल सांगितले. अशा प्रकारे या गोष्टींची सुरुवात होते. हा देखील सायबर गुन्ह्याचा एक भाग आहे..."
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अक्षयकुमारनं त्याच्या मुलीचा अनुभव सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण विनंती केली. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना र आठवड्याला 'सायबर पीरियड' (Cyber Period) नावाचा एक तासिका असावी अशी मागणी त्यानं केली. तसंच या तासिकेमध्ये मुलांना सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती आणि शिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा त्यानं केली.
"तुम्हा सर्वांना माहीत आहे की हा गुन्हा (सायबर क्राईम) स्ट्रीट क्राईमपेक्षा (Street Crime) मोठा होत चालला आहे. हा गुन्हा थांबवणे खूप महत्त्वाचे आहे..." त्याने सरकारला डिजिटल युगात मुलांना सुरक्षित आणि माहितीपूर्ण ठेवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात सायबर शिक्षणाचा समावेश करण्याची विनंती अक्षयनं केली.
या कार्यक्रमात अक्षय कुमारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, इकबाल सिंह चहल (IPS) आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.