जाहिरात

Dussehra 2025: 'रावणाने महिलेचा सन्मान केला, खासदारांनी...?' दसऱ्याच्या दिवशी अभिनेत्रीनं लिहलं वादग्रस्त पत्र

Dussehra 2025 : 'आज (2 ऑक्टोबर 2025) देशभरात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याचवेळी अभिनेत्रीनं एक पत्र लिहलं आहे.

Dussehra 2025: 'रावणाने महिलेचा सन्मान केला, खासदारांनी...?' दसऱ्याच्या दिवशी अभिनेत्रीनं लिहलं वादग्रस्त पत्र
Dussehra controversy : “डियर रावण… तुम्ही फक्त घाईगडबडीत एका महिलेचे अपहरण केले, अशी या पत्राची सुरुवात आहे.
मुंबई:


Dussehra 2025 : 'आज (2 ऑक्टोबर 2025) देशभरात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याचवेळी अभिनेत्री सिमी गरेवाल यांचे एक ट्विट खूप व्हायरल झाले आहे. हे ट्विट व्हायरल होण्याचं कारण देखील खास आहे. कारण, दसऱ्याच्या या पवित्र दिवशी देशभर रावणाचे पुतळे जाळून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा जल्लोष केला जातो.  त्याचवेळी सिमी यांनी या ट्विटबद्दल रावणाबद्दल वेगळे मत मांडले आहे. सिमी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये रावणाला 'थोडासा खोडकर' (a little mischievous) असे म्हटले आहे. जे पारंपरिक विचारधारेच्या अगदी उलट आहे.

काय आहे ट्विट?

सिमी ग्रेवाल यांनी या ट्विटमध्ये लिहलंय,  “डियर रावण… तुम्ही फक्त घाईगडबडीत एका महिलेचे अपहरण केले, पण त्यानंतर तुम्ही तिला तो आदर दिला जो आजकाल लोक सहसा महिलांना देत नाहीत. तुम्ही तिला चांगले जेवण दिले आणि महिला सुरक्षा रक्षक (female security guards) दिले. तुम्ही तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण तिने नकार दिल्यावर तुम्ही तिच्यावर कधीही तेजाब (acid) फेकले नाही.

 भगवान रामाने तुमचा वध केला, तेव्हा तुम्ही इतके समजूतदार होता की माफी मागत होता. मला वाटते, तुम्ही अर्ध्याहून अधिक संसदेतील (half of Parliament) सदस्यांपेक्षा जास्त सुशिक्षित (educated) होता. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला जाळण्यासाठी माझ्या मनात कोणतीही कठोर भावना (hard feeling) नाही.”

ट्विटमुळे गदारोळ

या ट्विटमुळे चाहते आणि समीक्षक यांच्यात जोरदार वादविवाद (heated debate) सुरू झाला. काहींनी याला सर्जनशील विचार (creative thought) म्हटले, तर काहींनी रावणानं केलेल्या गुन्ह्यांचा (उदाहरणार्थ रंभा आणि वेदवती यांच्याशी गैरवर्तन) मुद्दा उपस्थित केलाय. अभिनेत्रीनं याकडं दुर्लक्ष केल्याची आठवण त्यांनी केली. 

( नक्की वाचा : CCTV Video: अंबरनाथमध्ये थरार! लोकल येत असताना ट्रॅकवर उडी घेणाऱ्या चेन स्नॅचरला GRP-RPF ने पाठलाग करत पकडले )
 

 “कुणी तुमचे अपहरण केले, तर काय तो खोडकरपणा (mischief) असेल?” असा प्रश्न एका युझरनं उपस्थित केलाय.  तर, सिमी यांच्या समर्थकांनी रावणाच्या गुंतागुतीच्या व्यक्तिमत्त्वाला (complex character) समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, असा युक्तीवाद केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com