दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेपासून प्रभावित झालेल्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दिल्ला पोलिसांच्या स्पेशल सेलनं झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोलिसांसोबत एक जॉईंट ऑपरेशन करत ही कारवाई केली आहे. रांचीमध्ये राहणारा डॉक्टर इश्तियाक या मॉडेलचा प्रमुख होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशभरात अनेक ठिकाणी दहशतवादी कृत्य करण्याचा त्यांचा प्लॅन होता. या मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या जागी शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग देण्यात आली होती. पोलिसांनी राजस्थानमधीसल भिवाडीमधून 6 संशयित दहशतवाद्यांना शस्त्र चालवण्याच्या ट्रेनिंग दरम्यान अटक केली आहे.
झारखंड आणि उत्तर प्रदेशातून आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या या जॉईंट ऑपरेशनमध्ये शस्त्र,दारु-गोळा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. सध्या देखील धाडसत्र सुरु आहे.
( नक्की वाचा : महिलेनं घटस्फोटाच्या वेळी मागितली महिना 6 लाखांची पोटगी! न्यायाधीश म्हणाल्या, 'स्वत: कमव' )
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशात अनेक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी घटना रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालं आहे.