Pregnant Women: ही कसली नोकरी? महिलांना गर्भवती करा आणि लाखो कमवा...

महिलांना गर्भवती करणे ही देखील नोकरी आहे, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? या कंपनीचं नाव आहे ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब प्ले बॉय सर्विस या कंपनीनं तरुणांना ही ऑफर दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महिलांना गर्भवती करणे ही देखील नोकरी आहे, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? या कंपनीचं नाव आहे ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब प्ले बॉय सर्विस या कंपनीनं तरुणांना ही ऑफर दिली होती.  या कंपनीची कृत्य पाहून तुमचं डोकं चक्रावेल. ज्या महिलांना मुल होत नव्हतं त्यांना गर्भवती (Pragnent Women) करण्यासाठी या कंपनीमध्ये तरुणांना भरती केलं जात होतं. त्यासाठी कामावर ठेवण्यात आलेल्या मुलांकडून पैसे वसूल केले जात होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी दिली जात होती नोकरी?

भामटे सोशल मीडिया आणि फोन कॉलच्या माध्यमातून तरुणांना फसवत होते. ज्या महिलांना मुल होत नाहीय त्यांना मदत केली तर 5 ते 10 लाख रुपये बक्षिस तुम्हाला मिळू शकतं, अशी ऑफर त्यांना दिली जात होतीा.

बिहारमधील नवादा जिल्ह्यातले हे प्रकरण (Bihar Cyber Crime) आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन सायबर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

या भामट्यांनी अटक झाल्यावर त्यांच्या कामाची पद्धत सांगितली. त्यानुसार, हे साध्या सरळ तरुणांना जाळ्यात ओढत असत. सोशल मीडिया आणि फोन कॉल्सची यासाठी मदत घेतली जात असे. त्यांना लाखोंची ऑफर ते देत. महिला गर्भवती झाली नाही तरी तुम्हाला किमान 50 हजार रुपये मिळतील, अशी लालूच त्यांना दाखवली जात होती. पैशांच्या लोभापायी तरुण हे काम करण्यास तयार होत होते. या तरुणांकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 500 ते 2000 रुपये घेतले जात होते. 

(नक्की वाचा : EXCLUSIVE : पुण्यात सारथी अनुदान घोटाळा? खासगी कोचिंग क्लासेसना, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचीही साथ! )
 

डीएसपी इमरान परवेज यांनी दिलेल्या माहितीनुसार कहुआरा गावातील एका बागेत बसून हे सायबर गुन्हेगार काम करत होते. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे व्हॉट्सअप चॅट, ग्राहकांचे फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग तसंच बँक व्यवहारांची माहिती घेतली जात आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article