Crime News: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार, काय आहे कारण?

पनवेलकर यांच्यावर झालेला हा हल्ला त्यांच्या राहात्या घरी झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अंबरनाथ:

निनाद करमरकर 

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. हा घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे. पनवेलकर हे एक नावाजलेले बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने अंबरनाथमध्ये भितीचे वातावरण आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पनवेलकर यांच्यावर झालेला हा हल्ला त्यांच्या राहात्या घरी झाला आहे. अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले. त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार खासदार असं का बोलले?

शहराच्या मध्यभागी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस, तसेच क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ही अशा घटना होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय बांधकाम व्यावसायिकांमध्ये ही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.