जाहिरात

Crime News: बॉसशी अफेयर, ब्रेकअप अन् हॉटेलमध्ये शेवट! तिने वाट पाहिली, पुढं जे घडलं... अंबरनाथ हादरलं

दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. 

Crime News: बॉसशी अफेयर, ब्रेकअप अन् हॉटेलमध्ये शेवट! तिने वाट पाहिली, पुढं जे घडलं... अंबरनाथ हादरलं

Ambernath Crime:  अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या तरुणीचं ऑफिसच्या बॉससोबत अफेअर होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली.

VIDEO: मोठा अपघात टळला! छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचे कार पार्किंगमध्ये लँडिंग, पायलटकडून गंभीर चूक

बॉसशी अफेयर, ब्रेकअप अन् शेवट 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिमरन पाटील असं या तरुणीचं नाव होतं. ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील विम्प्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट्स कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत होती. या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं २ वर्ष अफेअर होतं, मात्र २ महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होते.

यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला. तो परत येईल, याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्यानं तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर भगवान लोटे परत आला असता तिने दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, तसंच भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Mumbai News: वाहतूक पोलिसांनी मागितला 'इतका' दंड, रिक्षाचालक थेट फिनाईल प्यायला.. मुंबईत खळबळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com