शुभम बायस्कार, प्रतिनिधी
कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानं पतीनं पत्नीला ठार मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अक्षय लाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्यानं त्याची पत्नी भाग्यश्री उर्फ अंजली लाडेची हत्या केली. या हत्येनंतर आरोपी अक्षय फरार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पोलिसांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री आणि अक्षयमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक वादातून खटके उडत होते. या वादामधूनच भाग्यश्री माहेरी म्हणजेच तिच्या आई-वडिलांकडे राहत होती.
आरोपी अक्षयनं मी बाहेरगावी जात आहे, घरी असलेलं तुझं सामान घेऊन जा असं सांगून भाग्यश्रीला घरी बोलावलं. ती घरी आल्यानंतर तिची हत्या केली. अंजलीच्या गळ्यावर पोलिसांना घाव आढळून आले आहेत. त्याचबरोबर गळा दाबल्याच्या खुणा दिसून येत आहे. या घटनेनंतर अक्षय फरार आहे. नेमकी ही हत्या कशाने केली याचा तपास सध्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत आहेत.
( नक्की वाचा : Mumbra Video : मराठीचा आग्रह केल्यानं संतापले मुंब्राकर, कान पकडायला लावले, त्याच्यावरच गुन्हा दाखल )
कसा लागला छडा?
दरम्यान भाग्यश्री दुचाकीनं प्रभू कॉलनीमधील घरी गेली होती. ती रात्रभर माहेरी न परतल्यानं भाग्यश्रीच्या आईनं फ्रेजपुरा पोलीस स्टेशनमध्ये भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीचा शोध सुरु केला. त्यावेळी तिचा फोन आणि दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळून आले. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातले सीसीटीव्ही तपालले. त्यामध्ये भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यानेच हे वाहन रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचं त्यांना आढललं.
त्यानंतर पोलिसांनी तातडीनं भाग्यश्रीच्या घराच्या दिशेनं धाव घेतली. घराला कुलुप लावल्यानं त्यांना शंका वाटली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री बेडरुममध्ये मृत्यूमुखी पडलेली दिसली. तिच्या मानेवर तसंच हातावर चाकूनं वार केल्याचे निशाण होते. फॉरेन्सिक टीमनं केलेल्या तपासणीनंतर काल (बुधवार 1 जानेवारी) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास अक्षयनं भाग्यश्रीची हत्या केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्षयच्या अटकेसाठी पोलिसांची पथकं रवाना झाले आहेत.