आंध्रप्रदेशाच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या महिलेला मृतदेहाचं पार्सल आलं आहे. तोपर्यंत महिलेला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तिला वाटलं की विजेची उपकरणं आहेत. या पार्सलमध्ये मध्यम वयाच्या व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आहे. या व्यक्तीची उंची 5 फूट 7 इंच लांब होता आणि पार्सलच्या बॉक्समध्ये त्याचा मृतदेह दुमडून ठेवला होता. महिलेला त्या मृतदेहासह एक पत्रही मिळालं ज्यात 1.3 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक्
मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता आणि लाकडाच्या बॉक्समध्ये पॅक करण्यात आला होता. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील महिलेला हे पार्सल पाहून जबर धक्का बसला आहे. ही भयावह घटना पश्चिमी गोदावरी जिल्ह्याच्या उंडी मंडलच्या एका गावातील आहे.
नागा तुलसी नावाच्या महिलेने घर बांधण्यासाठी वित्तीय मदतीसाठी क्षेत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता. समितीने महिलेला टाइल्स पाठवल्या होत्या. घर बांधण्यासाठी महिलेने पुन्हा क्षेत्रिय सेवा समितीकडे मदतीचं आवाहन केलं. समितीने विद्युत उपकरणे देण्याचे आश्वासन दिलं होतं. यानंतर महिलेला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मिळाला होता. ज्यानुसार, तिला दिवे, पंखे आणि स्विच सारख्या वस्तू दिल्या जाणार आहेत.
गुरुवारी रात्री एका व्यक्तीने महिलेच्या घराच्या दरवाज्यावर एक बॉक्स ठेवला आणि यात विजेची उपकरणं असल्याचं सांगून निघून गेला. यानंतर तुलसीने पार्सल उघडलं आणि त्यात एका व्यक्तीचा मृतदेह पाहून धक्काच बसला. या सर्व घटनेने तिच्या कुटुंबालाही जबर धक्का बसला. महिलेने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
नक्की वाचा - बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटली अन्..., पेण तालुका हादरला!
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अदनान नईम असमी यांनीही गावाचा दौर केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
या पार्सलमध्ये एक पत्रही मिळालं आहे. यात 1.30 कोटींची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण केली नाही तर कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. सध्या हे पार्सल आणणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.