जाहिरात

Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक् 

प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. त्या पुढील काही मिनिटं त्या मद्यधुंद व्यक्तीला मारत होत्या.

Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक् 
पुणे:

पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिनाभरापासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात महिलांनी स्वसंरक्षणाची तलवार उपसण्याची गरज अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुण्यातील एक व्हिडिओमधील महिलेचं रणरागिणीचं रुप पाहून सारेजण अवाक् झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

3000 रुपयांची पनीर मखनी? मुंबईतील तारांकित हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर व्हायरल

नक्की वाचा - 3000 रुपयांची पनीर मखनी? मुंबईतील तारांकित हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर व्हायरल

गर्दीमध्ये अनेकदा महिलांना पुरुषांच्या घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात. अनेकदा तर गर्दीची संधी साधत ते नको त्या ठिकाणी स्पर्शही करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सर्व गोष्टींचा महिलेलाच मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र यावर त्याचवेळी प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. 18 डिसेंबर रोजी पुणे येथील एसटी बसमध्ये शिर्डीच्या एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेडछाड काढली. यावेळी प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. त्या पुढील काही मिनिटं त्या मद्यधुंद व्यक्तीला मारत होत्या. यानंतर व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले.

परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. जवळजवळ अर्धा तास प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं. त्यानंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काही वेळाने ते पोलीस चौकीत आले. परंतु गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही तिच्या मदतीला आली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिच्या सोबत तिचा नवरा गाडीचे ड्रायव्हर आणि बस कंडक्टर होते. सर्व महिला बस सोडून दुसऱ्या बसमध्ये निघून गेल्या होत्या. हे अतिशय चुकीचं आहे, अशी भावना प्रिया यांनी व्यक्त केली. सद्यपरिस्थितीत महिलांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तरच महिलांवरील अत्याचार बंद होतील असं प्रिया यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: