- ग्वाल्हेर शहरातील २१ वर्षीय तरुणीवर तिच्या नातेवाईक आणि भारतीय लष्करातील जवानाने अत्याचार केले
- आरोपीने तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्ती केली
- आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक शोषण करत राहिला
Gwalior Case: रक्षकच बनला भक्षक असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैन्यात फौजी असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातल्या मुलीची फसवणूक केली आहे. त्याने नुसती फसवणूक केली नाही तर तिचे लैंगिक शोषण ही केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने सर्वात आधी तिच्यावर गुंगीचे औषध देवून बलात्कार केला. त्यात अडकू नये म्हणून त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तो वर्षाभर तिच्यावर लैंगिक अत्याचार करतच राहीला. शेवटी त्याने आपला रंग दाखवत त्या तरुणीला नाकारले.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात ही घटना घडली आहे. इथं एका 21 वर्षीय तरुणीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी रामनिवास ऊर्फ राम बंजारा हा भारतीय लष्करात जवान म्हणून कार्यरत आहे. नातेसंबंधाचा फायदा घेत त्याने या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण केले. जवळपास वर्षभर तो त्याला वाटेल त्या वेळी तिचे लैंगिक शोषण करत होता.
4 जानेवारी 2025 रोजी आरोपीने तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने हुकुमगड येथे बोलावून घेतले. वाढदिवसाच्या पार्टीला नेण्या ऐवजी त्याने तिला तिथे असलेल्या शेतातील एका झोपडीत नेले. तिथे तिला त्याने कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर त्याच झोपडीत बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीली सर्वा प्रकार लक्षात आला. तिने त्याला विरोध केला. पण त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिची समजूत घातली. ऐवढेच नाही तर त्यानंतर तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
नक्की वाचा - Thane News: आईच्या कुशीतून 3 महिन्यांची चिमुकली पळवली, थरारक घटना CCTV मध्ये कैद
गेल्या वर्षभरापासून आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. लग्न होणार आहे त्यामुळे तरुणीने ही विरोध केला नाही. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नाचा विषय काढताच त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. ऐवढेच नाही तर आपण फौजी असल्याचा रुबाब ही झाडला. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आपली फसवणूक झाल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. तिने तात्काळ घाटीगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.