जाहिरात

Arthur Road Jail : आर्थर रोड जेलमध्ये राडा! अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या गँगस्टरवर हल्ला; दोन टोळ्या भिडल्या

Arthur Road Jail Clashes: घटनेने तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उच्च सुरक्षा व्यवस्था असूनही असा हिंसाचार कसा घडला हे शोधण्यासाठी तुरुंग प्रशासनाने संपूर्ण घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Arthur Road Jail : आर्थर रोड जेलमध्ये राडा!  अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या गँगस्टरवर हल्ला; दोन टोळ्या भिडल्या

Attack On Gangster Arthur Road Jail:  मुंबईतील उच्च सुरक्षा असलेल्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी प्रसाद पुजारीसह एकूण 7 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : येरवडा तुरुंगात कसाबचे भूत? कैद्यांमध्ये दहशत; माजी IPS अधिकाऱ्याची खळबळजनक माहिती

 पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तुरुंगातील दोन वेगवेगळ्या गटांमधील परस्पर भांडण इतके वाढले की प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. तुरुंग प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने घेतले आणि तात्काळ एनएम जोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, जिथे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ (२) अंतर्गत दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात ज्या सात कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात इरफान रहीम खान, शुएब खान उर्फ भूरया, अयुब अनुमुद्दीन शेख, मुकेश सीताराम निषाद, लोकेंद्र उदय सिंग रावत, सिद्धेश संतोष भोसले आणि गुंड प्रसाद विठ्ठल पुजारी यांचा समावेश आहे. या टोळीयुद्धात कोणत्याही कैद्याला गंभीर दुखापत झालेली नाही असे पोलिस आणि तुरुंग प्रशासन दोघांनीही स्पष्ट केले आहे.

 दरम्यान, या घटनेने तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उच्च सुरक्षा व्यवस्था असूनही असा हिंसाचार कसा घडला हे शोधण्यासाठी तुरुंग प्रशासनाने संपूर्ण घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Lady Don: लेडी डॉन होणार आई! नवरा गँगस्टर तिहार जेलमध्ये बंद, पण आता...

कोण आहे प्रसाद पुजारी?

प्रसाद पुजारीचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले आहे. तो दोन दशकांपासून फरार होता आणि त्याच्या पत्नीसह चीनमध्ये राहत होता. तो ट्रॅव्हल व्हिसावर तिथे गेला होता आणि २००८ मध्ये व्हिसाची मुदत संपली होती. बराच काळ फरार राहिल्यानंतर, त्याला मार्च २०२४ मध्ये चीनमधून भारतात आणण्यात आले आणि सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्याचे पूर्ण नाव प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिड उर्फ जॉनी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com