Ashok Kharat: 4650 व्हिडीओ, 451 अकाऊंट डिलीट! खरातच्या SIT चौकशी समोर आले 'हे' 5 धक्कादायक राज

या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 4650 व्हिडीओ लिंक व्हायरल झाल्या होत्या. त्या सायबर टीमने डिलिट केल्याचं त्यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपूते यांनी अशोक खरात प्रकरणात महत्वाची माहिती दिला आहे
  • अशोक खरातवर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात १२ गुन्हे दाखल असून त्यातील ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे
  • तपासात समोर आले की खरात महिलांना लैंगिक अत्याचार करत होता तसेच अंधश्रद्धा पसरवून आर्थिक फसवणूक करीत होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशी करत आहे. या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आल्याचं एसआयटी  प्रमुख तेजस्वी सातपूते यांनी सांगितलं. खरात नेमकं काय काय करायचं हे आता चौकशीत समोर आलं आहे. याबाबत सातपूते यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही खुलासे केले आहेत. खरात हा महिलांना कशा पद्धतीने फसवत होता? त्या मागे त्याचा काय उद्देश होता? पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल कसे झाले? त्यावर पोलीसांनी काय कारवाई केली याची संपूर्ण माहिती त्यांना या पत्रकार परिषदेत दिली. शिवाय खरातचे सीडीआर कसे बाहेर आले याचे ही उत्तर यावेळी सातपूते यांनी दिले. 
 
तेजस्वी सातपूते यांनी सांगितले की  20 मार्च 2026 ला एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाकडे आहेत. त्यासाठी 24 जणांचे तपास पथक तयार करण्यात आले. अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 12 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे असं त्यांनी सांगितलं. या 9  पैकी 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचार संबंधी आहेत. तर बाकीचे फसवणूक आणि अंधश्रद्धे बाबत असल्याचं सातपूते यांनी सांगितलं. आर्थिक फसवणुकीचे ही गुन्हे असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणात 30 पेक्षा अधिक साक्षिदारांकडे चौकशी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

नक्की वाचा - Ajit Pawar: अशोक खरात, अघोरी पुजा अन् अजित पवारांचा विमान अपघात! 'ते' SMS चौकशीच्या फेऱ्यात

शिवाय या प्रकरणातील पीडितय महिलांची ही चौकशी  करण्यात आली. त्या मोठ्या धैर्याने पुढे आल्या आहेत. त्यांनी कुटुंबीयांना ही विश्वासात घेतलं आहे. अशा वेळी या पीडितच महिलांच्या मागे खंबीर पणे उभे राहण्याची सर्वांचीच भूमीका असली पाहीजे असं त्या म्हणाल्या. चौकशी दरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्याचं त्या म्हणाल्या. खरात हा पीडित महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. तो त्यांना भिती दाखवत होता. त्यातून खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पुजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे ही उकळत होता. तो ऐवढ्यावरच थांबत होता असं नाही. त्या ही पुढे तो जात होता.  

Advertisement

नक्की वाचा - Beed News: मस्साजोगमध्ये सरपंच पोटनिवडणूक! संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात, गावकऱ्यांचा निर्णय काय?

पीडित महिलांना तो आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचं सांगत होता. त्यातून तो तुमच्या कुटुंबीयांना मी मारेन, त्यांचा मृत्यू होईल अशी भिती ही दाखवत होता. महिलांची बदनामी करण्याची धमकी ही त्याने दिली होती. त्यातून तो महिलांचे वारंवार लैंगिक शोषण करत होता ही माहिती ही तपासात समोर आली आहे. या शिवाय तो  इशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखीने दैवी शक्ती दाखवत होता. त्यातून त्याने अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार ही केला होता. या सर्व गोष्टींना महिला बळी पडत होत्या.  आता या प्रकरणात पीडीत महिला धाडसाने पुढे आल्या आहेत. त्यांच्यामुळे आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यास मदत होत आहे. या महिलांनी लोक काय म्हणतील या भितीने अन्याय सहन केला आहे. 

नक्की वाचा - Ashok Kharat : अशोक खरातचं 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर; किशोरवयात 'कारनामा' करून झाला होता पसार 

आता त्यांच्या कुटुंबाला ही विश्वासात घेतले आहे. त्यांचे व्हिडीओ, ओळख व्हायरल करू नका असे कोर्टाचे निर्देश असल्याचे सातपूते यांनी यावेळी सांगितले. तसे झाल्यास त्यांच्या मानसिक आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या मुलाखती घेण्यास बंदी असल्याचं ही त्यांनी सांगितलं. मीडिया ट्रायल ही नको असं त्या म्हणाल्या. पीडितांची ओळख दाखवणाऱ्यां विरोधात कारवाई होवू शकते असं ही त्या म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 4650 व्हिडीओ लिंक व्हायरल झाल्या होत्या. त्या सायबर टीमने डिलिट केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय सोशल मीडियावर ही वारंवार आक्षेपार्ड गोष्टी टाकल्या जात होत्या. असे 451 अकांऊट कायमचे बंद करण्यात आले आहे. दरम्यान अशोक खरातची माहिती ईडीला ही देण्यात आली आहे. हे प्रकरण संवेदनशिल आहे. त्यामुळे चार्जशिट दाखल होत नाही तो पर्यंत काही गोष्टी गोपनीय ठेवणे गरजेचे आहे असं त्या म्हणाल्या. या प्रकरणात अल्पवयीन कोणी नाही असं त्यांनी सांगितलं. शिवाय सीडीआरची चौकशी शासन स्तरावर होत आहे असं त्या म्हणाल्या.  

Topics mentioned in this article