जाहिरात

Ashok Kharat : अशोक खरातचं 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर; किशोरवयात 'कारनामा' करून झाला होता पसार 

भोंदूबाबा अशोक खरातच 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर आलं आहे.

Ashok Kharat : अशोक खरातचं 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर; किशोरवयात 'कारनामा' करून झाला होता पसार 
AI Image

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : अशोक खरातच 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर आलं आहे. आपल्याच नात्यातील महिलेवर जादूटोणा करत अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलं होत नसल्यानं खरातनं जादूटोण्याचा पहिला प्रयोग केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आली आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, अगदी तसंच अशोक खरात प्रकरणातच्या नव्या धक्कादायक माहितीवरुन समोर येत आहे. आता त्याच्या किशोरवयातील एक धक्कादायक आणि संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. किशोर वयातच खरातनं आपल्या भोंदूगिरीला सुरुवात करत जादूटोण्याच्या माध्यमातून पहिल्यांदा महिलेला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

किशोरवयीन असताना जादुटोणा करीत पहिलं कांड

कोपरगाव तालुक्यातील आपल्या नात्यातील एका महिलेला फसवून भोंदूगिरीच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार साधारण १९८० च्या सुमारास घडल्याचं समजतंय. जेव्हा अशोक उर्फ लक्ष्मण खरात हा किशोरवयीन होता तेव्हा त्यानं जादूटोणा करत पहिल कांड केल्याची माहिती समोर येत आहे. मुल होत नसल्याच्या अडचणीचा गैरफायदा घेत गंडेदोरे आणि पूजा-विधीच्या आडून त्या महिलेला जाळ्यात ओढण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यावेळी ही घटना समोर आल्यानंतर गावात कुजबुज सुरू झाली, वातावरण तापलं आणि खरात अचानक गायब झाला.

नक्की वाचा - Sambhajinagar : पैशाच्या हव्यासापोटी स्त्रीत्वही विसरल्या; पांढऱ्या वेशातील सख्ख्या बहि‍णींच्या कृत्याने संताप

या प्रकरणानंतर तब्बल पंधरा वर्षे तो कुठे होता? काय करत होता? कोणाच्या आश्रयाखाली होता? हे सर्व प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. कारण, पंधरा वर्षांनी तो थेट आपल्या मूळ गावी कहांडळवाडी येथे परतला. अशोक खरातच्या भूतकाळातील ही काळी बाजू आता एकामागून एक समोर येत असून या प्रकरणाचा विस्तार किती खोलवर आहे याचा अंदाज यावरून येतो. पुढील काळात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार? आणि पोलीस तपासातून नेमकी कोणती सत्यता बाहेर येणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com