सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Bunglow Video : महिलांवर अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला नाशिक क्राइम ब्रँचने नुकतीच अटक केलीय. खरातला अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. पोलिसांना खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाले. खरातचं बिंग फुटल्यानंतर त्याच्या संपत्तीबाबतही धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातचे शिर्डी,निघोज,निमगावनंतर आता सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आलिशान मालमत्ताही समोर आलीय. मिरगावमध्ये तब्बल 35 एकर जागेवर उभारलेला जवळपास 13 कोटी रुपये किमतीचा राजेशाही थाटात असलेल्या दगडी बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अनेक राजकीय मंडळी आणि सेलिब्रिटीही भेट द्यायचे
‘ब्रम्हासदन' नावानं ओळखली जाणारी ही भव्यदिव्य वास्तू केवळ एक निवासस्थान नसून ऐश्वर्य,प्रभाव आणि सत्तासंपर्काचं प्रतीक म्हणून ओळखली जाते.सुसज्ज इमारत, विस्तीर्ण परिसर आणि आलिशान बांधकाम यामुळे या ठिकाणी नेमकी कोणाची वर्दळ होती,कोण कोण या बंगल्यात यायाचे? या बंगल्यात नेमकं काय काय घडत होतं? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे,या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी आणि सेलिब्रिटीही भेट द्यायचे, असं बोललं जातंय. ‘
इथे पाहा ब्रम्हसदन बंगल्याचा व्हायरल व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) March 20, 2026
फक्त शिर्डीच नव्हे, सिन्नर,शिर्डी आणि कोपरगाव परिसरातही खरातच्या नावावर मोठी संपत्ती असल्याचं समजते. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा प्रश्न अनेकांना पडला असून तपास यंत्रणांनाही याचा कसून तपास करत आहेत. महिलांचं शोषण,फसवणुकीतून आणि आर्थिक ब्लॅकमेलिंगमधून मिळालेल्या पैशातून ही संपत्ती उभी राहिली का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world