उत्तर प्रदेश: मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडासारखाच आणखी एक प्रकार उत्तर प्रदेशातील औरैया येथे उघडकीस आला आहे. 5 मार्च रोजी मैनपुरी येथील व्यावसायिक दिलीप कुमार (वय, 24) यांच्यावर लग्नाच्या 15 दिवसांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 5 मार्च रोजी मैनपुरी येथील व्यावसायिक दिलीप कुमार (२४) यांचे फाफुंड येथील रहिवासी प्रगतीशी लग्न झाले. लग्नाच्या १५ दिवसांनी १९ मार्च रोजी दिलीपवर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्याचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या हत्येचा तपास करताना खळबळजनक खुलासा केला असून पत्नी प्रगतीनेच सुपारी देऊन प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
5 मार्च रोजी लग्नानंतर प्रगती तिच्या सासरी राहायला आली. सासरी आल्यानंतर तिला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हते तसेच त्याच्याशी संपर्कही साधता येत नव्हता त्यामुळे ती बैचेन झाली. जेव्हा ती तिच्या सासरच्या घरातून चौथ्या दिवशी तिच्या आईवडिलांच्या घरी परतली तेव्हा तिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला. तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. तिने 2 लाख रुपयांना भाड्याने घेतलेले शूटर्स सांगून त्यांना हत्येची सुपारी दिली.
19 मार्च रोजी, मैनपुरीतील भोगांव येथील व्यापारी दिलीप कुमार याच्यावर कन्नौजमधील उमरदा येथे गोळीबार करणाऱ्यांनी हल्ला केला. गोळीबार करणाऱ्यांनी त्याला मारहाण केली. यानंतर त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी झाडण्यात आली. नंतर, ते शेतात फेकून देण्यात आले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. 21 मार्च रोजी दिलीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर तिला सासरच्या मंडळींनी स्वखुशीने दिलेले १ लाख रुपये तिने शूटर्सना हत्येआधी दिले होते. दरम्यान, या प्रकरणी प्रगतीसह प्रियकर अनुराग यादव आणि अचलदा येथील रहिवासी रामजी नगर या शूटरलाही अटक करण्यात आली. आरोपींकडून पिस्तूल, दुचाकी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.