ऑस्ट्रेलियामध्ये एका सुनेने तिच्या सासू-सासरे आणि पतीच्या काका-काकींना जेवणासाठी बोलावले. तिने जेवणात मशरूमची एक डिश बनवली. सर्वांनी मोठ्या आवडीने ती खाल्ली. पण जेवणानंतर काही दिवसांतच सासू, सासरे आणि काकी यांचा मृत्यू झाला. पतीचे काका थोडक्यात बचावले. ही गोष्ट आहे विषारी मशरूम वापरून केलेल्या हत्येची. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. या प्रकरणी गेल्या महिन्यातच 12 जणांच्या ज्युरीने आपला निर्णय दिला. एरिन पॅटरसन या महिलेला जुलै 2023 मध्ये विषारी मशरूम शिजवून तिच्या सासू- सासऱ्यांचा खून केला. डॉन आणि गेल पॅटरसन असं त्याचं नाव होतं. तसेच तिची काकी हीथर यांची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. यात पतीचे काका मात्र बचावले. पाद्री इयान विल्किंसन हे या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत. ते आपल्या पत्नीची अजूनही आठवण काढतात.
ज्युरीने एरिन पॅटरसनला इयान विल्किंसनच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दलही दोषी ठरवले आहे. न्यायाधीशांनी सांगितले की 8 सप्टेंबर रोजी मेलबर्नच्या न्यायालयात तिला शिक्षा सुनावली जाईल. ज्यावेळी या महिलेने तिच्या सासरच्या मंडळींची ही हत्या केली, त्यावेळी तिचे आणि तिच्या पतीचे संबंध बिघडले होते. दोघे कायदेशीररित्या पती-पत्नी असले तरी ते बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते. मुलांच्या संगोपनासाठी पती किती पैसे देणार, यावरून त्यांच्यात वाद होता.
नक्की वाचा - Nashik Crime : इन्स्टाग्राम जीवघेणा ठरतोय? अल्पवयीन मुलीने राहत्या घरात घेतला गळफास
त्या महिलेने तिचा पती सायमन पॅटरसन यालाही जेवणासाठी बोलावले होते. पण त्याने येण्यास नकार दिला होता. त्याने न्यायालयात आपल्या नातेवाईकांना गमावल्याचे दुःख सांगितले. तो म्हणाला, "मी माझ्या आई-वडील आणि काकीला जास्त मिस करतोय. पुढची 30 वर्षे मी हे लक्षात ठेवेन की जर एरिनने त्यांची हत्या न करण्याचा निर्णय घेतला असता, तर ते आजही जिवंत असते." तो पुढे म्हणाला, "या हत्यांमुळे माझ्या दोन मुलांना त्यांच्या आजी-आजोबांशिवाय राहावे लागले आहे. तिच्या मुलांनाही आता तिला भेटता येणार नाही. तो अधिकारही आता तिने गमावला आहे.
'डेथ कॅप' मशरूमला जगातील सर्वात धोकादायक बुरशी मानले जाते. मशरूम देखील एक प्रकारची बुरशी आहे. अनेक मशरूम खाण्यायोग्य असतात आणि काही जीवघेणे विषारी असतात. एरिन पॅटरसनच्या विषारी मशरूमचे जेवण खाऊन इयान विल्किंसन जरी बचावले असले, तरी ते अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाहीत. विल्किंसन म्हणाले की, ते जेवण खाल्ल्यापासून त्यांचे आरोग्य कधीही पूर्णपणे ठीक झाले नाही. त्यांचे यकृत आता कमी काम करते, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यांची ऊर्जाही कमी झाली आहे. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले होते.