जाहिरात

Mumbai Nanded Vande Bharat: मुंबई-जालना 'वंदे भारत' नांदेडपर्यंत, कधीपासून सुरुवात? शेड्यूल, थांबे अन् तिकीटदर

Mumbai Jalna Vande Bharat Express Extended To Nanded : मुंबई ते नांदेडपर्यंतच्या वंदे भारतमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना जलद आणि आरामदायक, आधुनिक रेल्वे यात्रेची सुविधा मिळेल.

Mumbai Nanded Vande Bharat: मुंबई-जालना 'वंदे भारत' नांदेडपर्यंत, कधीपासून सुरुवात? शेड्यूल, थांबे अन् तिकीटदर

Mumbai Jalna Vande Bharat Express Extended To Nanded : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक काळापासून केलेली मागणी आता पूर्ण होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत केला जाणार आहे. आधी ही हाय स्पीड ट्रेन आठवड्यातील सहा दिवस (बुधवारव्यतिरिक्त) जालना ते मुंबईदरम्यान धावत होती. मात्र आता 26 ऑगस्टपासून ही ट्रेन नांदेडपर्यंत धावेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांना मोठा फायदा मिळेल. 

ही गाडी नांदेड ते मुंबईदरम्यान 610 किमीचं अंतर अवघ्या 9 तास 25 मिनिटात पार करेल. 

शेड्यूल?  l Mumbai Jalna Vande Bharat Express Schedule

मिळालेल्या माहितीनुसार,  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पासून ही ट्रेन दुपारी 1.10 वाजता रवाना होईल आणि रात्री 10.50 वाजता नांदेडला पोहोचेल. मंगळवारी लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही ट्रेन दररोज सकाळी 5 वाजता एच.एस. नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल आणि दुपारी 2.25 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या वंदे भारतमुळे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास सव्वा तीन तासात पूर्ण होईल. 

मुंबई ते नांदेड वंदे भारतचे थांबे l Mumbai Nanded Vande Bharat Express Stops

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

दादर

ठाणे

कल्याण

नाशिक रोड

मनमाड

औरंगाबाद

जालना

परभणी

नांदेड

यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना जलद आणि आरामदायक, आधुनिक रेल्वे यात्रेची सुविधा मिळेल. तर नांदेड परतीचा प्रवास पहाटे 5 वाजता सुरू होईल. 

मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस तिकीट - l Mumbai nanded Vande Bharat Express ticket rate

CSTM ते नांदेडपर्यंत एसी चेअर कारचं तिकीट - 1,750 रुपये, तर एक्जिक्यूटिव्ह चेअर कारसाठी प्रवाशांना 3,300 रुपये मोजावे लागतील. 

रेल्वेने मराठवाड्यात सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत जोडला जाईल. मुंबई-नांदेड वंदे भारत ट्रेन सेवा विशेषत: परभमी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल. आतापर्यंत ते या आधुनिक आणि जलद रेल्वे सेवेपासून वंचित होते. 
 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com